लॉस एंजेलिस- गायिका चेर हिने संगीत निर्माता अलेक्झांडर 'ए.ई.'सोबत तिचा रोमान्स सुरू असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. एडवर्ड्स आणि तिच्या वयामध्ये ४० वर्षे अंतर असल्यामुळे टीका करणाऱ्यांवरही ती बरसली आहे. वयाची ७६ गाठलेली गायिका चेर हिने तिचा ३६ वर्षिय प्रियकरासोबत विकेंडचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
एडवर्ड्सला मॉडेल अंबर रोज हिच्यासोबतचा तीन वर्षांचा मुलगा स्लॅश आहे. 2 नोव्हेंबर रोजी वेस्ट हॉलीवूडमधील क्रेगच्या रेस्टॉरंटमध्ये एका डेट नाईटला ही जोडी हातात हात घालून फिरताना दिसल्याच्या काही दिवसांनंतर ही घोषणा आली आहे. त्यांच्या वयातील फरक सांगणाऱ्यांना प्रतिसाद देत, चेर म्हणाली: "मी आमचा बचाव करत नाही. . द्वेष करणारे द्वेष करत राहोत. काही फरक पडत नाही आणि कोणालाही त्रास देत नाही."
जेव्हा दुसर्या युजरने अलेक्झांडरच्या "हेतू" बद्दल प्रश्न केला तेव्हा तिने उत्तर दिले: "तुम्हाला दुसरे काही करायला मिळाले नाही का!? मला समजावून सांगा..कोण काही म्हणतंय याचा मी अजिबात विचार करत नाही."