महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

निवडून कोणीही या, पण आमचा प्रश्न मार्गी लावा; तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा अधिकार

नागपूर लोकसभा क्षेत्रातून ३० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपूर लोकसभा क्षेत्रात एकूण २१ लाख ६० हजार २३२ मतदार आहेत. ज्यामध्ये १० लाख ९६ हजार ३२९ पुरुष मतदार व १० लाख ६३ हजार ८२८ महिला मतदार व ७५ तृतीयपंथी मतदार आहेत. यावेळी तृतीयपंथीयांनीही मतदानाचा अधिकार बजावला आहे.

By

Published : Apr 11, 2019, 5:28 PM IST

तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा अधिकार

नागपूर - सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातल्या सात जागांवर मतदान होत आहे. यात नागपूर मतदार संघाचाही समावेश आहे.

तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा अधिकार

नागपूर लोकसभा क्षेत्रातून ३० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपूर लोकसभा क्षेत्रात एकूण २१ लाख ६० हजार २३२ मतदार आहेत. ज्यामध्ये १० लाख ९६ हजार ३२९ पुरुष मतदार व १० लाख ६३ हजार ८२८ महिला मतदार व ७५ तृतीयपंथी मतदार आहेत. यावेळी तृतीयपंथीयांनीही मतदानाचा अधिकार बजावला आहे.

उत्तर विधानसभा क्षेत्रातील सिंधी महाविद्यालय मतदान केंद्रावर आज जवळपास १५ हून अधिक तृतीयपंथीयांनी मतदान केले. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी सांगितले, की सत्ता कोणाचीही आली तरी चालेल पण, त्यांनी तृतीयपंथी वर्गाला सुविधा निर्माण करून द्याव्यात. सत्तेत आल्यानंतर लवकरात लवकर तृतीयपंथी बिल आणावे आणि ज्याप्रमाणे छत्तीसगड, तेलंगणा व आंधप्रदेश राज्यांमध्ये तृतीयपंथी वर्गासाठी स्वतंत्र शौचालय, आवासयोजना कॉलनी व इतर सवलती मिळाल्या आहेत, त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही द्याव्यात.

ABOUT THE AUTHOR

...view details