अमरावती -अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली ( Amravati Chemist Murder ) होती. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं ही हत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केलं ( Umesh Kolhe Murder Case Due Post About Nupur Sharma ) आहे. तसेच, उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास अमरावती पोलिसच करत असल्याचेही साळी ( DCP Vikram Sali ) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 'अटक केलेल्या आरोपींकडे हत्येचा हेतू स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही हत्या या प्रकाराचीच संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले,' असे उपायुक्त साळी यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण? -शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.