ठाणे :चौसष्ठ कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा समस्त भक्तजनांचा लाडका आहे.Ganeshotsav in Maharashtra महाराष्ट्रात गणपती हे आराध्य दैवत आहे. इतक्या कलांचा अधिपति असलेल्या गणरायाचा कलेत समावेश करावा ही कल्पना सुमन दाभोळकर Suman Dabholkar Artist या कलाकाराच्या मनात आली लागलीच सुमन यांनी गावच्या नदीवर जाऊन दगड हुडकले नदीतल्या दगडांच्या नैसर्गिक आकाराला कोणत्याही प्रकारचा छेद न देता त्या आकारातून कला साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. गणराया, मूषक आणि मोदक ह्यांचं स्टोन आर्ट बनविले आहे. ते स्टोन आर्ट Stone Art पाहून जणू गणराया ,मूषक ,मोदक हे सारे माझ्या गावच्या नदीवर दगडाच्या रुपात पहुडलेलेच होते सुमन यांनी त्यांना हुडकण्याचं काम केलं. ही भावना स्टोन आर्ट साकारल्या नंतर मनी आली. सर्वात शेवटी कलांचा अधिपति दगडावर साकारला गेला ते पाहण्याचं सुख कलाकार म्हणून निराळंच असे मत सुमन दाभोळकर यांनी वक्त केले आहे.
कलाकाराने साकारलेल्या गणेशाच्या विविध कलाकृती
या आधी साकारले अनेक शिल्प :सुमन दाभोळकर यांनी याआधी लता मंगेशकर नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प या नदीतल्या दगडातून साकारलेली आहेत आणि ही शिल्प नागरिकांच्या पसंतीस देखील पडत आहेत आपल्या मनात असलेल्या मूर्तीसाठी आवश्यक ते दगड शोधण्याचे काम सुमन दाभोळकर फार प्रेमाने करतात आणि त्यातूनच त्यांच्या या शिल्पाला जिवंतपणा मिळतो असे त्यांनी सांगितले आहे.
गणपतीच्या सजावटीसाठी बाजारात काॅपरवर कृत्रिम सोन्याचे पाणी लावलेल्या आभूषणांना मागणी -गणेश मूर्तीचे सौंदर्य खुलवणाऱ्या सोने चांदीच्या आभूषणांना बाजारात नेहमीच मागणी असते. एक दिवसावर येऊन ठेपलेल्या गणपतीच्या सजावटी तसेच आभूषण खरेदीकरता ग्राहकांची पावले सराफांच्या दुकानांकडे वळताना दिसत आहेत. परंतू ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी हुबेहूब सोन्यासारखी दिसणारी पण सोन्याचे पाणी किंवा मुलामा नसलेल्या काॅपरवर आर्टिफिशल सोन्याचे पाणी देऊन घडविलेल्या सुबक कमळ, जास्वंदी, दुर्वांचा हार,मोदक, पूजेसाठी लागणारे केवड्याचे पान,पाच फळांची परडी आणि प्रसाद म्हणून सजावटीसाठी ठेवण्यात येणारा पिवळाशार धमक रंगात खुलणारा केळीच्या घडाच्या प्रेमात पडलेले गणेशभक्त दिसत आहे.मुलीला शाळेत सोडल्यानंतर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर हौस म्हणून मोत्याचे दागिने,तोरण करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू कारागिरांना कडून सोन्याला पर्याय म्हणून घरगुती गणपती सजावटीसाठी वजनाने हलके असे काॅपरवर कृत्रिम सोन्याचे पाणी लावून आभूषण बनवण्यास सुरुवात केली आणि आज मुंबई, ठाण्यात सुबक गुलाबी रंगातील कमळाला,विड्याचे पान सुपारी, दुर्वांचा हार याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती अमृता बांदेकर सांगतात.
कॉपरचे दागिने स्वस्त आणि टिकाऊ -गणपतीसमोर सजावट करायची भक्तांची इच्छा असते.परंतू सोने चांदीची महागडी आभूषण बनवणे शक्य होत नाही. मात्र त्याचवेळी गणेशभक्तांना आकर्षित करणारी काॅपरची दागिने पसंतीस उतरत आहे. पारंपरिक दागिन्याबरोबरच शेला,परशू, त्रिशूळ,बिखबाळी , मुकुट , खड्याची कंठी, तर बाप्पाच्या समोर प्रसाद म्हणून सजावटीसाठी सोनेरी रंगातील केळीचे पान, पाच फळांची परडी,सहा केळ्यांचा घड, मोदक तर फूलांमध्ये पिवळा सोनचाफा, लाल रंगाची जास्वंदीची फुले यांनाही मागणी असल्याचे अमृता सांगतात.
इकोफ्रेंडली बाल छटा दाखवणाऱ्या बाप्पांच्या आकर्षक मुर्त्या -बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती हि विशेष आणि देखणी असावी यासाठी प्रत्येक भक्त प्रयत्न करत असतो. म्हणूनच मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या बाल छटा असणाऱ्या मुर्त्या विशेष आकर्षक आहेत. लोअर परेल येथील आपल्या 'त्रिमूर्ती स्टुडिओ' या कार्यशाळेत विशाल शिंदे यांनी बाप्पांच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू केले. बाप्पांच्या बाल छटा असलेल्या वेगवेगळ्या मुर्त्या ते साकारतात. वयाच्या अगदी सहाव्या वर्षापासून त्यांनी मूर्ती बनवण्याचे काम सुरू केलं. मात्र 2006 सालापासून त्यांनी बाप्पाच्या बाल छटा असणाऱ्या मुर्त्या तयार करायला सुरुवात केली. वडिल सूर्यकांत शिंदे यांच्याकडूनच प्रेरणा घेत विशाल शिंदे यांनी बाप्पांची मूर्ती घडविण्यास सुरुवात केली.
इको-फ्रेण्डली बाल छटा असणाऱ्या विशेष मुर्त्या -चाळीत राहत असताना पासूनच आपण बाप्पाच्या बाल छटा असणाऱ्या मुर्त्या तयार केल्या पाहिजेत अशी कल्पना विशाल शिंदे यांना आली. चाळीत असणारी लहान मुलं घरात खेळताना कशी खेळतात, खुर्ची वर कशी बसतात, उशी किंवा गादीवर कशाप्रकारे लोटांगण घालतात या सर्व बाबी विशाल यांनी लक्षपूर्वक पाहिल्या. अशाच बाल छोटा असणाऱ्या बाप्पाच्या मुर्त्या त्यांनी तयार करायला सुरुवात केली. लहान बाळाचा निरागस पण हा सर्वांना आवडत असतो. त्यांनी केलेल्या कृत्यांना सर्वांसाठीच लोभनीय असतात. त्यामुळे बाल छोटा असणाऱ्या मुर्त्या जर आपण तयार केल्या तर भक्तांना त्या नक्कीच आवडतील. म्हणून आपण बाप्पाच्या या वेगळ्या मुर्त्या तयार करायला लागले. मात्र या मूर्ती तयार करत असताना त्या सर्व मुर्त्या पर्यावरणपूरक तयार करण्यात येतात. या सर्व मुर्त्या मातीपासून तयार करण्यात आले आहेत. तसेच या इको फ्रेंडली बाप्पा च्या मुर्त्या भक्तही चांगला प्रतिसाद देत असल्याचे विशाल शिंदे यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना सांगितले.
केदार शिंदे ही घेतात विशाल शिंदे यांच्याकडून मूर्ती -पर्यावरणाची काळजी घेत इकोफ्रेंडली बाल छटा असणारी मूर्ती आपल्या कार्यशाळेत तयार केली जाते याची माहिती मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळाली. आपण तयार केलेल्या मुर्त्या यांना प्रचंड आवडल्या. म्हणून गेल्या तीन वर्षांपासून ते स्वतः कार्यशाळेत येऊन त्यांची मूर्ती घेऊन जात आहेत. तसेच विदेशातूनही त्यांच्या मूर्तींना मागणी आहे. मात्र या मुर्त्या हाताळण्यास कठीण असल्यामुळे सध्या तरी ते विदेशात या मुर्त्या पाठवत नाहीत. मात्र ओडिसा राजस्थान पंजाब दिल्ली या राज्यातून बाल छटा असणारा या मूर्तींना मागणी वाढत असल्याचे विशाल शिंदे सांगतात.
रॉयल क्लब नावाने सुरू झाला गणेशोत्सव -विदर्भाची सांस्कृतिक नगरी असणाऱ्या अमरावतीच्या जुन्या परिसरात बुधवारा परिसरात असणारे आझाद हिंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपला 95 वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. 1927 मध्ये राष्ट्रीय कार्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे या भावनेतून सुरू झालेला गणेशोत्सव स्वातंत्र्यानंतर सामाजिक भान जपणारा उत्सव म्हणून अमरावतीत साजरा होतो आहे. आज देखील आपली प्रतिष्ठा जपत आझाद हिंद मंडळ संपूर्ण विदर्भात अतिशय मानाचे गणेशोत्सव मंडळ आपली प्रतिष्ठा राखून आहे.
गणेशोत्सव मंडळाच्या नाटकांमध्ये पहिल्यांदाच स्त्री पात्र -1948 - 49 या काळामध्ये महाराष्ट्रात नाटकामध्ये स्त्रीचे पात्र हे पुरुषच करायचे. अमरावतीच्या आझाद हिंद मंडळाने पहिल्यांदाच 1948 मध्ये गणेशोत्सव मंडळात नाटकाची परंपरा सुरू केली आणि विशेष म्हणजे या नाटकांमध्ये पहिल्यांदाच स्त्रीचे पात्र स्त्रीनेच रंगवलेले सर्वांना पाहायला मिळाले. सामाजिक जागृतीपर नाटक, ऐतिहासिक नाटक त्यावेळी मंडळाच्या वतीने सादर व्हायला लागली. प्राध्यापक म.ल व्यवहारे नंतर दादासाहेब दिघेकर ,किशोर दिघेकर ,नानासाहेब साठे यांनीही नाटकाची परंपरा त्यावेळी या मंडळात सुरू केली. आणि नंतरच्या काळामध्ये राजाभाऊ मोरे यांनी या परंपरेला चांगलं उत्तम स्वरूप दिलं.
शाडू मातीची बाप्पाची मूर्ती महाग -पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा अस नेहमी सांगितलं जात. त्यासाठी शाडू मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तीची स्थापना करा अशी जनजागृती आणि मोहीम राबवली जाते. मात्र यावर्षी पिओपी पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती चांगल्याच महाग झाल्या आहेत. जवळपास दीड पटीने किंमतीत ही वाढ झाल्याने पर्यावरण प्रेमी भक्तांच्या खिशावर मोठा भार पडला आहे. एक फुटाची मूर्ती साधारणतः एक हजार रुपयांच्या घरात जात आहे. त्याच आकाराची पी ओपी ची मूर्ती शहाशे ते सातशे रुपयात येते. या महागाई मुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीती गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिक रोहित फुटाणे यांनी व्यक्त केली आहे.
शाडू मातीची किंमत वाढली -गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शाळांमधे शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी शाडू मातीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र ही माती देखील महाग झाली आहे. मागील वर्षी पर्यंत ३० ते ३५ रुपये किलोने मिळणारी माती यावर्षी ५५ ते ६० रुपये किलो दराने बाजारात मिळत आहे. त्यामुळे शाडू माती पासुन बाप्पांची मूर्ती साकारणे महाग झाले असल्याने पर्यावरण वाचवणे खूपच महाग झाल्याचं दिसून येत आहे. सरकारने उत्सवाच्या काळात तरी महागाई कमी करावी अशी विनंती पर्यावरणप्रेमी भक्तांनी केली आहे
हेही वाचाGaneshotsav 2022 Pune कसबा ते केसरीवाडा, पहा यंदा ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची आगमन मिरवणूक