नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज तोंडलीचे दर कालच्या तुलनेत 700 रुपयांनी वाढले आहेत. सद्यस्थितीत घरगुती लोणचे बनविण्यासाठी कैरीची मागणी फार वाढल्याने कैरीच्या दरात कालच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबी देखील कालच्या तुलनेत 1 हजार रुपयांनी वाढली आहे. मिरचीचे दर 1 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर, वाटण्याचे दर 100 किलोप्रमाणे 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
लिंबू प्रति 100 किलो - 6000 ते 7000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे - 6000 ते 8000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे - 1700 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे - 2800 रुपये ते 3000 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये - 4800 ते 5500 रुपये
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे - 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे - 3500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे - 2100 ते 2400रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे - 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे - 3300 ते 3800 रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे - 2500 ते 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे - 1600 ते 1800रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे - 2200 ते 2600 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे - 4600 ते 5200 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे - 2600 ते 3000 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे - 2600 ते 3000 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे - 5000 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे - 3500 ते 4000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे - 2200 ते 2400 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे - 4800 ते 5500 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे - 3200 ते 3500 रुपये