ठाणे -लॉकडाऊनचा काळ संपुष्टात आल्यानंतरही पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडच्या विलासपूर जिल्ह्यातील डोंबारींची वणवण सुरू आहे. खेळ करून उपजीविका चालवणारी ही कुंटुंबे ठाणे जिल्ह्यात दाखल झाली आहे. यापैकी डोंबाऱ्यांची 17 कुटुंबीयांनी कल्याण तालुक्यात स्थलांतर केले आहे. रस्त्यांवर विविध स्वरूपाचे खेळ दाखवून डोंबारी हे कोरोना काळातही दिवस काढत आहेत.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसह विविध शहरात डोंबारी जमात एक महिन्यापासून आपल्या कुटुंबीयांसमवेत आले आहेत. रस्त्यांवर विविध प्रकारच्या सर्कशीतील खेळ दाखवून नागरिकांकडून आर्थिक चणचण सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गेल्या दीड वर्षात कोरोना काळात अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. हातावर पोटाची खळगी भरत असणाऱ्या कुटुंबीयांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. कल्याण शहरात असेच एक चार जणांचे कुटुंब भुकेची चिंता मिटविण्यासाठी छत्तीसगड राज्यातून विलासपूर नजीक असलेल्या खेडेगावात आले आहेत. सर्कशीतील खेळ दाखवून पैशांची पुंजी जमविण्यात हे कुटुंब व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-Maharashtra Breaking - राज्यपालांनी ठाकरे सरकारला भेट नाकारली, सरकार-राज्यपाल वाद चिघळणार?
"पापी पेट का सवाल है" ....
विलासपूर येथील शेत मजुरी करणारी गौड समाजाची जमात आपल्या १७ बिऱ्हाडासह येथे स्थिरावले आहेत. छत्तीसगडमधून एक बिऱ्हाड कल्याण येथे आले आहे. सर्कशी खेळ बंद झाल्यानंतर शत्रुघ्न गौड (वय-४५) यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पापी पेट का सवाल है असे सांगितले. महाराष्ट्रात कलेला वाव मिळत आहे. त्यामुळे आमची भुकेची चिंता मिटली असल्याचे सांगितले.
हेही वाचा-नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
'देगा उसका भला, न देगा उसका भी भला' ...
डोंबारी शत्रुघ्न यांच्याबरोबर त्यांची पत्नी साधमती, दहा वर्षाचा राकेश नावाचा मुलगा, तर आठ वर्षाची सुहासी नावाची मुलगी खेळाचे नमुने दाखवितात. राकेश व सुहासी ही मुले प्रत्यक्षात डोंबारी कलेचे प्रात्यक्षिक दाखवून कला पाहणाऱ्या नागरिकांकडून "देगा उसका भला, न देगा उसका भी भला' या युक्तीचा वापर करीत पैसे जमा करतात. रस्त्यांच्या समांतर दोरखंड उभारून खुंटी टांगून त्या दोरखंडावर रिंग ॲटम, दोरखंडावर थाळीवर - चप्पलेवर चालणे, उडी मारणे, झोका फिरविणे आदी विविध दहा प्रकारचे सर्कशी खेळ दाखवितात. आठ वर्षाची सुहासी व दहा वर्षाचा राकेश या दोरखंडावर उभे राहून आपली कला सादर करीत उपजीविकेसाठी झगडताना दिसून येत आहे.
हेही वाचा-जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे
आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेली ...
छत्तीसगड राज्यातील गौड आडनावाची आदिवासी जमात आहे. शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत मागासलेली जात आहे. उपजीविकेसाठी छत्तीसगडमधील राज्यात शेतावर मोलमजुरी करीत कुटुंबीयांची गुजरण साधारणपणे भागवीत आहेत. शेत मजुरीमध्ये हवी अशी मिळकत भेटत नाही. त्यामुळे विलासपूर या ग्रामीण भागात लहानपणापासूनच मुलांना सर्कशीतील विविध प्रकारच्या कसरती शिकवून त्यांना तरबेज केले जात
एका खेळातून मिळतात दोनशे ते तीनशे रुपये ...
दीड वर्षाच्या कोरोना काळात शेत मजुरी व इतर कामधंदे यातून आर्थिक मिळकत कमी मिळू लागली होती. विलासपूर या गावातील सतरा कुटुंबीयांनी महाराष्ट्रात प्रस्थान करून पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यांवर डोंबाऱ्याचे प्रयोग सुरू केले. किमान अर्धा तास चालणाऱ्या खेळाच्या सर्कशीत दोनशे ते तीनशे रुपये मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. पोटाची खळगी भरण्यासाठी ही चिंता सध्यातरी दूर झाली असल्याची भावना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवताना दिसून येत होती.