महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 2, 2020, 12:36 PM IST

ETV Bharat / city

#coronavirus : कोरोनाचा वाढता फैलाव पाहून ठाणे पोलिसांनी काढला रूट मार्च

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यात आज ठाण्यात लॉकडाऊनचे तंतोतंत पालन व्हावे आणि ठाण्यातील नागरिकांनी याबाबत पुरेपूर काळजी घ्यावी, या करिता जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढला.

police route march in thane city
कोरोनाचा वाढता फैलाव पाहून ठाणे पोलिसांनी काढला रूट मार्च

ठाणे - कोरोना विषाणूचा विळका मुंबई, पुणे या शहरांसह आता ठाण्यातही वाढू लागला आहे. शहरात दररोज किमान दहा वीस तरी करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळेच नागरिकांमध्ये जनजागृती आणि लॉकडाऊनचे नियम कळावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने लाॅंग मार्च काढत ठाणेकरांना पुन्हा एकदा कळकळीचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव पाहून ठाणे पोलिसांनी काढला रूट मार्च

हेही वाचा...कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक

'घरात रहा, सुरक्षित रहा'

ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने यावेळी नागरिकांना पोलिसांनी संदेश दिला. घरी राहण्याचे आवावहन केले. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा लाॅंग मार्च काढण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी नागरिक सर्रास रस्त्यावर येतात, अशा ठिकाणी गल्ली बोळातून देखील हा मार्च काढण्यात आला. जर नियमांचा भंग केला आणि विनाकारण घराबाहेर पडलात तर थेट जेलची हवा खाली लागेल, लाॅकडाऊनचे नियम आता आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी घरीच रहावे, अशी तंबी यावेळेस पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details