ठाणे -राजा राणीचा संसार थाटून वैवाहिक जीवन नव्याने सुरु करण्याचे एका गुन्हेगाराने ठरवले होते. विशेष म्हणजे त्याच्या लग्नाची तारीखही ठरली होती. मात्र, लग्नसोहळा धुमधकड्यात साजरा करण्यासाठी व सासरच्या मंडळींवर रुबाब झाडण्यासाठी तसेच होणाऱ्या बायकोला महागड्या कारमध्ये फिरविण्यासाठी, त्याला गरज होती बक्कड पैश्याची म्हणूनच त्याने एक दोन नव्हे, तर अकरा गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून तो लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच शांतीनगर पोलिसांच्या बेडीत अडकला आहे. शिवसिंग अमीर सिंग बाबरी (20) रा. टेमघर, भिवंडी, असे गुन्हेगाराचे नाव आहे.
खबऱ्यांमुळे लागला पोलिसांच्या हाती -
भिवंडी शहरात विविध वाहने व सोनसाखळी, मोबाईल हिसकावून पळविण्याच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी सर्वच पोलीस ठाण्यात गस्त वाढविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पथकाने तपास सुरु केला असता एक मंगळसूत्र लंपास करणारा चोरटा भिवंडीत टेमघर पाईपलाईन परिसरात येणार असल्याची खबर मिळावी होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी शिवसिंगला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याचा चोरीच्या उद्देशाचा कारनामा समोर आला.
चोरीच्या पैश्यातून नवीन संसार थाटण्याचा मनसुबा उधळला -