महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 27, 2021, 4:33 PM IST

Updated : Sep 9, 2021, 4:51 PM IST

ETV Bharat / city

#WorldDogDay: ठाण्यात रस्त्यावरील भटक्या श्वानांना अँटी रेबीज लसीकरण मोहीम

आंतरराष्ट्रीय श्वान दिवस जगभर साजरा करण्यात येतो. शिवाय श्वानापासून मानवाला असलेले फायदे सांगण्यासाठी आणि श्वानांना दत्तक घेण्याकरिता प्रोत्साहित करण्याच्या हेतूने साजरा केला जातो. श्वान हे आपले मित्र असून तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग कसा आहे, याची जाणीव करून देण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा हा दिवस आहे.

WorldDogDay
#WorldDogDay: ठाण्यात रस्त्यावरील भटक्या श्वानांना अँटी रेबीज लसीकरण मोहीम

ठाणे -श्वान हे नेहमी माणसाचे सर्वात चांगले मित्र मानले जातात. या लाडक्या मित्राबद्दल प्रेम सादर करण्यासाठी 26 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन डोंबिवलीतील पॉज या प्राणीमित्र संस्थेने रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवून श्वानांसोबत जागतिक श्वानदिन साजरा केला.

2004 सालापासून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय श्वान दिवस -

आंतरराष्ट्रीय श्वान दिवस जगभर साजरा करण्यात येतो. शिवाय श्वानापासून मानवाला असलेले फायदे सांगण्यासाठी आणि श्वानांना दत्तक घेण्याकरिता प्रोत्साहित करण्याच्या हेतूने साजरा केला जातो. श्वान हे आपले मित्र असून तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग कसा आहे, याची जाणीव करून देण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा हा दिवस आहे. प्राणी बचाव वकील कॉलिन पायगे हिने अमेरिकेत 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय श्वान दिवस हा राष्ट्रीय श्वान दिवस म्हणून सुरू केला. 26 ऑगस्टची तारीख तिने निवडली. कारण ती तारीख आहे जेव्हा तिच्या कुटुंबाने त्यांचा श्वान शेल्टीला प्राणी निवारागृहातून दत्तक घेतले. तिने या दिवसाची स्थापना कुत्र्यांची सुटका करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केले आणि त्यांना त्यांच्यासाठी कौतुक म्हणून सुरक्षित वातावरण प्रदान केले. हा दिवस श्वान दत्तक घेण्यास प्रोत्साहित करतो आणि पाळीव प्राण्यांच्या दुकानातून कुत्रा खरेदी करण्याच्या संकल्पनेला तीव्र विरोध करतो, अशी माहिती पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी दिली.

रस्त्यावरील भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस -

या दिवशी विविध प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था विविध कार्यक्रम आयोजित करतात. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्लांट अँड अनिमल वेल्फेअर सोसायटीतर्फे डोंबिवली मधील भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. यात गुप्ते रोड डोंबिवली पश्चिम आणि पूर्वेकडे मॉडेल कॉलेज पट्ट्यात राहणाऱ्या रस्त्यावरील भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. पॉज संस्था वर्षभर मुंबई, आणि उपनगरे ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बाराही महिने लसीकरणाची मोहीम राबवत असल्याचे पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले.

पाळीव श्वानांचे फोटो समाजमाध्यमावर शेअर -

जागतिक श्वान दिनाच्या निमित्ताने मराठी सेलेब्रिटींनी देखील त्यांच्या आवडत्या कुत्र्यांबरोबर काढलेले फोटो समाजमाध्यमावर शेअर केले आहेत. तर मुंबई इंडियन्स टीमने देखील त्यांच्या लाडक्या पाळीव श्वानांचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा -BANK HOLIDAY ऑगस्टमध्ये उद्यापासून चार दिवस बँका राहणार बंद

Last Updated : Sep 9, 2021, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details