ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात धर्मीचा पाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. तिच्या डोळ्यादेखत तिचे मुलं झोळीतच दगावल्याने त्या मातेचं काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. या घटनेनंतर शिंदेच्या गटाच्या स्थानिक आमदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन Death of a newborn child due to lack of road दिले. तसेच रस्त्याच्या कामासाठी १० लाखांचा निधी आमदार फंटातून जाहीर केल्याची माहिती आमदार शांताराम मोरे यांनी MLA visit in Padaदिली.
मातेच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू भिवंडी तालुक्यातील दिघाशी ग्रामपंचायत हद्दीतील धर्मीचा पाडा येथील, दर्शना परले (वय ३५) या गर्भवती महिलेस १ सप्टेंबर रोजी प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने तीला प्रसुतसाठी दिघाशी येथील १ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात गावकरी निघाले होते. मात्र रस्त्याअभावी झोळीत टाकून जंगलातून तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत पायपीट करत असतानाच, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसुती झाली. मात्र आरोग्य सेवा ऊपलब्ध नसल्याने, तातडीने ऊपचार मिळाले नाही. त्यामुळे, झोळीतच या मातेच्या डोळ्या देखत मुलाचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर दर्शनाला आपल्या मुलाचा मृत्यू पहावा लागला.
आमदारांनी पोलीस बंदोबस्तात गाठला धर्मीचा पाडाखळबळजनक बाब म्हणजे, घटना घडून २४ तास उलटून गेले होते. मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिंधीनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या महिलेच्या कुटूंबाची भेट घेतली नसल्याने गावकरी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आज दुपारी शिंदे गटातील स्थानिक आमदार शांताराम मोरे हे पोलीस बंदोबस्तात धर्मीचा पाडा येथे १ किलोमीटर जंगल आणि ओढ्याच्या पाण्यातून पायपीट करत पीडित महिलेच्या कुटुंबाची भेट MLA visit after Death of a newborn child घेतली. दरम्यान आपण स्वतः सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यलयात जाऊन पीडित महिलेला सर्वतोपरीने न्याय मिळवून देण्यास लेखी पत्र देऊन पाठपुरावा करणार शिवाय लवकरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.