ठाणे : मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं. त्यांना मस्जिदच्या भोंग्यापासून त्रास होतो. मदरशांना बदमान करायचं काम त्यांचे आहे. अशा शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली? असा सवाल राज ठाकरे यांना करत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी केला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा 'जय महाराष्ट्र' केला आहे.
हेही वाचा -Bhandara Girl Rape : धक्कादायक! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, आरोपीला अटक
विकासाची 'ब्लु प्रिंट' ते मस्जिदीवरील भोंगे -मदरसापर्यंतइरफान शेख यांनी १६ वर्ष मनसेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून राज ठाकरे यांच्या मनातील ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरसांवर येऊन थांबतात. तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येते. पक्ष स्थापन झाल्यावर भूमिका होती की, जातीपाती विरहित राजकारण करायचं. म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत. आणि जीवतोड मेहनत देखील करत आहेत. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता. राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते...