ठाणे- गर्भवती पत्नीना रॉकल टाकून जाळल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना कळव्यातील मफतलाल कॉलनीमध्ये घडली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल चौरसिया असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे. त्यातून अनिल आणि त्याच्या पत्नीत वाद निर्माण झाला. दरम्यान 30 ऑक्टोंबर रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर न झाल्याने अनिलने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आग लावली. त्यात गर्भवती असलेल्या पत्नीच्या पोटातील सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तर ती गंभीररित्या भाजल्या गेली. लगेच शेजारच्यांनी पत्नीला रूग्णालयात दाखल केले. यासंदर्भात कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक केली आहे.
मनोहर आव्हाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे कळव्यातील मफतलाल कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिलेच्या पोटातील 6 महिन्याच्या अभ्रकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा -'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग
कळव्यातील मफतलाल कॉलनीतील रहिवासी अनिल चौरसिया हा आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत होता. मात्र काही दिवसानंतर त्याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केला. करवाचौथ सणाला आरोपीच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला लग्न झाले असल्याचा प्रकार सांगितला. ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजताच त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. त्यानंतर हा वाद मोठा होऊन आरोपीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. पीडित पत्नीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
6 महिन्याच्या बाळाचा पोटातच मृत्यू -
वारंवार भांडणे झाल्याने 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकल्यानंतर तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात जास्त भाजल्याने 6 महिन्याच्या बाळाचा पोटात मृत्यू झाला आहे. आता पोलिसांनी याबाबत तपास केला असता आरोपी पतीने दुसरे लग्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.