महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

gymnasium sealed by municipality : धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला पालिकेचे सील

शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या हस्ते सुरू झालेल्या एका व्यायाम (gymnasium started by Dharamveer Anand Dighe) शाळेवर, त्यांचीच सत्ता असलेल्या ठाणे महानगर पालिका प्रशासनाने (sealed by municipality in Thane) कारवाई केली आहे. शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप, शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर यांनी केला आहे.

By

Published : Sep 19, 2022, 5:58 PM IST

gymnasium sealed by municipality
व्यायामशाळेला पालिकेचे सील

ठाणे : शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या हस्ते सुरू झालेल्या एका व्यायाम (gymnasium started by Dharamveer Anand Dighe) शाळेवर त्यांचीच सत्ता असलेल्या ठाणे महानगर पालिका प्रशासनाने (sealed by municipality in Thane) कारवाई केली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सावरकर नगर येथे २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यायाम शाळेला पालिकेने भाडे न भरल्याने सील लावले आहे. या व्यायामशाळेचे सात महिन्यांचे भाडे थकल्यामुळे आणि अनधिकृत बांधकाम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. मात्र ही व्यायामशाळा चालवणारे शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक असल्याने, शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर


स्थानिकांमध्ये मोठा रोष : युवकांना शाररिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे हे आग्रही होते. त्यांनी ठाण्यात अनेक भागात युवकांसाठी अनेक व्यायाम शाळा बांधल्या होत्या. त्याचा वापर आजही हजारो लोक घेत आहेत. ठाण्याच्या सावरकर नगर या भागात २५ वर्षांपूर्वी १ हजार चौरस फुटांच्या जागेत व्यायामशाळा आनंद दिघे यांच्या हस्ते, त्यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या व्यायामशाळेची देखभाल शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेच्या वतीने केली जाते. कोरोना संकटाच्या काळात दोन वर्षे ही व्यायामशळा बंद असल्याने, सात महिन्यांचे सुमारे ६५ हजार रुपये भाडे थकले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर व त्यांच्या मित्रांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत थकीत भाड्यापैकी १५ हजार रुपये भरले आणि उर्वरित रकमेसाठी १५ दिवसांची मुदत मागीतली. या घटनेला चार दिवस उलटत नाही, तोच शुक्रवारी दुपारी महापालिकेचे ३० कर्मचाऱ्यांचे पथक सावरकर नगरमध्ये आले आणि संस्थेच्या लोकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यायामशाळेला थेट सील ठोकले आहे आणि यामुळेच स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.


ठाकरे समर्थक म्हणूनच झाली कारवाई :ठाण्यात उद्धव ठाकरे गटावर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. ठाकरे समर्थकांवर यापूर्वीही पालिकेला हाताशी धरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. व्यायामशाळा सील करण्याची कारवाईही अशाच प्रकारची असल्याचा आरोप स्थानिक शिवसेनेकडून केला जात आहे.



कारवाई नियमप्रमाणेच :या व्यायामशाळेचे भाडे थकले होते. त्यासोबत पालिकेने दिलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी महेर आहेर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details