महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जेसीबीच्या धक्क्याने गॅस लाईन फुटली; तत्परता दाखवल्याने मोठी हानी टळली

नौपाडय़ातील विष्णुनगर भागात अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. यावेळी खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागल्याने जमीनीखालील गॅसची लाईन फुटली; आणि गळती सुरू झाली.

gas pipeline broke in thane
जेसीबीच्या धक्क्याने गॅस लाईन फुटली; तत्परता दाखवल्याने मोठी हानी टळली

By

Published : Jan 22, 2020, 9:09 PM IST

Updated : Jan 22, 2020, 9:29 PM IST

ठाणे- नौपाडय़ातील विष्णुनगर भागात अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. यावेळी खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागल्याने जमीनीखालील गॅसची लाईन फुटली; आणि गळती सुरू झाली. मात्र, या ठिकाणी गर्दी नसल्याने मोठी हानी टळली. यामुळे या परिसरातील जवळपास 1500 नागरिकांना गॅस बंदचा फटका बसला. सायंकाळी ही लाईन दुरुस्त करण्यात आली. यानंतर प्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला.

जेसीबीच्या धक्क्याने गॅस लाईन फुटली; तत्परता दाखवल्याने मोठी हानी टळली

विष्णु नगर भागातील यश आनंद सोसायटी जवळील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण चालू आहे. खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागला. यामुळे महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. यावेळी वर्दळ कमी असल्याने मोठी हानी टळली आहे.

हेही वाचा -मुंब्रामध्ये #CAA आणि #NRC विरोधात ठिय्या आंदोलन

संबंधित घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महानगर गॅसचे पथकही या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर ही लाईन बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी ही सेवा पूर्ववत करण्यात आली.

Last Updated : Jan 22, 2020, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details