महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दीड दिवसांचे गणपती विसर्जन; जीवनरक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर

दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन वेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी गेल्या 10 वर्षांपासून जीवन रक्षकांच्या रक्षणासाठी लाईव्ह जॅकेट तसेच त्याचं विमा योजना काढण्याची मागणी करत आहेत. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जर या जीवन रक्षकांना काही झाल्यास त्याची जवाबदारी कोण घेणार अशा सवाल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

thane
जीवनरक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर,

By

Published : Sep 11, 2021, 10:53 PM IST

ठाणे - भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शुक्रवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती भावात करण्यात आले. त्यातच भिवंडी महापालिकेअंतर्गत 10 गणेश घाट येतात. गणेश विसर्जन घाटांवर कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने जीवन रक्षकांसह सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ नाराज असल्याचे दिसून आले आहे .

जीवनरक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर,
तर या पुढील विसर्जन होऊ देणार नाही.. दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन वेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी गेल्या 10 वर्षांपासून जीवन रक्षकांच्या रक्षणासाठी लाईव्ह जॅकेट तसेच त्याचं विमा योजना काढण्याची मागणी करत आहेत. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जर या जीवन रक्षकांना काही झाल्यास त्याची जवाबदारी कोण घेणार अशा सवाल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पालिका प्रशासनाला शहरातील खड्डे दिसत नाही. खड्डे न बुजवल्यास 5 व 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दीड दिवसांचे गणपती विसर्जन
मुस्लीम बांधवाकडून गणरायाचे विसर्जन गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी भिवंडीपूर्व चे आमदार रईस शेख यांच्याकडे जीवन रक्षकांसाठी सुविधा करण्याची मागणी केली होती विशेष म्हणजे शेलार गणेश घाट तसेच लोकमान्य टिळक गणेश घाट या ठिकाणी मुस्लीम बांधवाकडून विसर्जन करीत असतात . महामंडळाच्या मागणीनुसार आमदारांच्या वतीने जीवन रक्षकांसाठी तब्बल 100 लाईव्ह जॅकेट उपलब्ध करण्यात आले असून आज त्यांचे वितरण महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहेहेही वाचा -तब्बल दोन तास साप बसला चिमुकलीच्या गळ्यात फणा काढून; शेवटी केला दंश

ABOUT THE AUTHOR

...view details