महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इमारतीवरुन लोखंडी सळई खाली पडताना शरीरात घुसल्याने मजुराचा मृत्यू

नवीन इमारतीच्या बांधकाम ठिकाणी मजुरीचे काम करत असताना इमारतीवरून लोखंडी सळई अंगावर पडून शरीरात घुसल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अंबरनाथ परिसरातील बारकूपाडा येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली.

ulhasnagar
उल्हासनगर रुग्णालय

By

Published : Dec 9, 2019, 8:00 PM IST

ठाणे- नवीन इमारतीच्या बांधकाम ठिकाणी मजुरीचे काम करत असताना इमारतीवरून लोखंडी सळई अंगावर पडून शरीरात घुसल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अंबरनाथ परिसरातील बारकूपाडा येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली. अहलबुल हक (वय २७) असे मृत मजुराचे नाव आहे.

हेही वाचा -पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करून तरूणावर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अहलबुल हा मुळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा आहे. तो गेल्या काही दिवसापासून गायकवाडापाडा परिसरातील बारकूपाडा येथे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होता. दुपारच्या सुमारास तो इमारतीखाली काम करत असताना इमारतींवर ठेवलेल्या काही लोखंडी सळ्यांपैकी एक लोखंडी सळई वरून खाली पडताना ती अहलबुल याच्याा मानेजवळून शरीरात घुसली. त्यावेळी इतर मजुरांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ती सळई त्वरीत बाहेर काढून त्याला उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निकुंभ करत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांसाठी संरक्षणात्मक कोणतीही काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details