महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महापालिकेचा अजब कारभार; कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन आल्यानंतर शेजाऱ्यांना नेत होते विलगीकरण कक्षात

ठाण्यातील गोकुळ नगरमधील एका व्यक्तीला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार झाले. या दरम्यान त्यांचे कुटुंबीय होम क्वारंन्टाईन होते. 15 दिवसानंतर हा व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतला. दरम्यान महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पाटोळे हे आज सकाळी दोन बस, वैद्यकीय पथक असा फौजफाटा घेऊन गोकुळ नगरात आले. कोरोनाबाधिताच्या शेजाऱ्यांना भाईंदर पाडा येथील क्वारंन्टाईन सेंटरला घेऊन जाण्याची प्रक्रिया करत होते.

corona
आंदोलक

By

Published : Jun 18, 2020, 5:17 PM IST

Updated : Jun 18, 2020, 5:46 PM IST

ठाणे- कारोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन 15 दिवसांनी घरी परतल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱयांनी शेजारच्या नागरिकांना आज विलगीकरण कक्षात नेण्याचा घाट घातला. मात्र त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरल्याने ठाणे महापालिकेचे पथक रिकाम्या हाताने परत गेले. रहिवासी आणि स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या विरोधात आवाज उठवत प्रशासनाला याबाबत जाब विचारला.

महापालिकेचा अजब कारभार; कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन आल्यानंतर शेजाऱ्यांना नेत होते विलगीकरण कक्षात

गोकुळ नगरमधील एका व्यक्तीला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार झाले. या दरम्यान त्यांचे कुटुंबीय होम क्वारंन्टाईन होते. 15 दिवसानंतर हा व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतला. मात्र ठाणे महापालिकेच्या अजब कारभाराने येथील नागरिकांना धक्काच बसला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पाटोळे हे आज सकाळी दोन बस, वैद्यकीय पथक असा फौजफाटा घेऊन गोकुळ नगरात आले. ज्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती, त्यांच्या आजुबाजुच्या घरातील नागरिकांना भाईंदर पाडा येथील क्वारंन्टाईन सेंटरला घेऊन जाण्याची प्रक्रिया करत होते. ज्याला कोरोना झाला आहे, तो रुग्ण उपचार घेऊन घरी परतला. मग आता शेजाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा अट्टहास अधिकारी करत असल्याने नागरिक संतप्त झाले.

स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नगरसेवकाला विश्वासात न घेता नागरिकांना अशा प्रकारे बळजबरीने विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याबाबत त्यांनी आक्षेप घेत जाब विचारला. कोणतीही लक्षणे नसताना अशा प्रकारे विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याला रहिवाशांनी ठाम नकार दिला. तसेच विलगीकरण कक्षात कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कोणतीही लक्षणे नसताना विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर तेथील नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. बराच वेळ वादावादिनंतर अखेर या पथकाला रिकम्या हाताने परतावे लागले.

विलगीकरण कक्षात कोणतीही सुविधा नाहीत. बेड मिळत नसल्याने येथील दोन रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. 90 दिवसांपूर्वी ज्याला कोरोनाची बाधा झाली तेथील आजुबाजुच्या रहिवाशांना आता विलगीकरण कक्षात नेले जात आहे. एखाद्याला कोरोनाची चाचणी करायची असल्यास तीन दिवसांनी लॅबवाले बोलावत आहेत. एकूणच ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याची टीका नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.

Last Updated : Jun 18, 2020, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details