महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कौटुंबिक छळाला कंटाळून पलायन केलेल्या दोघी पालकांच्या स्वाधीन

कौटुंबिक छळाला कंटाळून गुजरातला पलायन केलेल्या दोन तरुणींना भोईवाडा पोलिसांनी सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आहे. कुटुंबीयांकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने त्यांनी पलायन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.

By

Published : Dec 5, 2019, 8:15 AM IST

bhiwandi police returned 2 daughters to their parents
कौटुंबिक छळाला कंटाळून पलायन केलेल्या दोघी पालकांच्या स्वाधीन

ठाणे - कौटुंबिक छळाला कंटाळून गुजरातला पलायन केलेल्या दोन तरुणींना भोईवाडा पोलिसांनी सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आहे. साजेदा खातून मोहम्मद तय्यद शाह (वय-20) आणि रेशम खातून रहमान शाह (वय-21) या दोन्ही तरुणी भोईवाडा येथील रहिवासी आहेत. दोघीही नात्याने मावशी-भाची असून, माणकोली येथील इंटेक्स गारमेंट कंपनीत त्या कार्यरत होत्या.

कुटुंबीयांकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने त्यांनी पलायन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तसेच पैशांच्या मागणीसाठी कुटुंबीयांकडून मारहाण होते. यामुळे दररोज होणाऱ्या छळाला कंटाळून या दोघींनी आठ दिवसांपूर्वी घर सोडले; आणि कामधंदा शोधण्यासाठी गुजरातला पळ काढला. यानंतर कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दोन्ही तरुणींच्या सुरक्षिततेला धोका असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी शोध मोहिमेसाठी विशेष पोलीस पथक नेमून शोधकार्य सुरू केले. या पथकातील पोलीस कर्मचारी अरविंद गोरले, निलेश महाले, ज्योती गायकवाड यांनी बेपत्ता मुलींकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले. यामध्ये दोन्ही तरूणी सुरत शहरातील रावनगर, लिंबायत असल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन बुधवारी (दि.04 डिसेंबर)ला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details