ठाणे - गृहमंत्री पद दिले तर शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी ( Amit thackeray comment on home minister post ) होण्याचा विचार करू, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे ( Amit thackeray news thane ) यांनी अंबरनाथमध्ये पत्रकारांशी गप्पा मारताना केले होते. अमित ठाकरेंनी त्यांच्या वक्तव्यावर सुरू असलेल्या चर्चेनंतर मात्र आज घुमजाव केला आहे. त्यांनी आज कल्याणात पत्रकारांशी बोलताना मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल, असे सांगत गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.
हेही वाचा -एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले - भाजप नेते चंद्रकांत पाटील
राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल -अंबरनाथमध्ये मनसेतर्फे संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळण्याबाबत वक्त्व्य केले होते. मनसेने शिंदे - फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेदरम्यान अमित ठाकरे यांना पत्रकारांनी विचारल असता, मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल, असे सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.
विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला -महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान अंतर्गत अमित ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना, त्यांनी संघटनात्मक काही बदल देखील केले जातील, या दौऱ्या दरम्यान विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतोय, त्यांच्या अडचणी जाणून घेतोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य सोपे करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार, असे सांगितले.
हेही वाचा -Girl died in truck accident : झोपडीवर उलटला ट्रक, टेडी बियर विकणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू