सोलापूर- हातकणंगले मतदारसंघासोबतच राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातूनदेखील निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. भाषण सुरू असतानाच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, ही मागणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होणार आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यात असलेल्या वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भाषणे सुरू असतानाच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघासोबतच माढा लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी, असा ठराव करण्याची मागणी यावेळी करण्यात आ
सभेत घोषणा देताना कार्यकर्ते ली.
खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघातील साखर कारखानदारांना वठणीवर आणले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळवून देत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागील अनेक वर्षापासून ते लढा देत आहेत. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माढ्यातून लढा सुरू करण्याची वेळ आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मतदारांनी स्वाभिमानीच्या पारड्यात मतं देऊन राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा २० हजार मतांच्या आतच विजय झाला होता. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीकडून माढाची निवडणूक लढवली होती. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. तर रविकांत तुपकर बुलडाण्यातून निवडणूक लढवणार असल्यामुळे खुद्द राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.