सोलापूर :सोलापूर-बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पार्टीला 'भारतीय जनता लॉन्ड्री' असे संबोधले. याचं उदाहरण देताना सुळेंनी सांगलीच्या खासदारांनी सांगितले की - बीजेपीत गेल्यापासून झोप चांगली लागते. इतके दिवस मी याला पक्ष समजत होते, पण ही तर भारतीय जनता लॉन्ड्री निघाली, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule answered Chandrashekhar Bawankule) उडविली. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना भाजप शिंदे गट राज्यात 45+जागा जिंकेल, असे वक्तव्य केले होते. त्यात बारामती पाहिले क्रमांकाचे असेल, त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं (Supriya Sule Press Conference in Solapur) आहे.
बीजेपी नव्हे तर भारतीय जनता लॉन्ड्री -भारतीय जनता पार्टीला आजतागायत मी पक्ष समजत होते, पण हे तर भारतीय जनता लॉन्ड्री आहे. अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडविली आहे. लॉन्ड्रीबाबत खुलासा करताना सुळेंनी अधिक विश्लेषणत्मक माहिती दिली. सांगली येथील खासदार मी आता बीजेपीमध्ये आहे, मला आता ईडीची भीती वाटत नाही. मला चांगली झोप लागते, असे भाजप खासदारांचं वक्तव्य आहे. मी आजतागायत बीजेपीला पक्ष समजत होते. मात्र हे भारतीय जनता लॉन्ड्री आहे, असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule answered in a press conference) लगावला.