महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात गॅस दरवाढी विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन

कोरोना महामारीमुळे देशात उद्योगधंदे बंद आहेत.अनेक कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नाही. हाताला काम नसल्याने दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला धडपड करावी लागत आहे. असे असताना देखील मोदी सरकार किंवा केंद्र सरकारने 1 जानेवारी 2021 पासून आजतागायत 140.50 रुपयांनी दरवाढ केली आहे.

Silent agitation
काँग्रेसचे मूक आंदोलन

By

Published : Aug 21, 2021, 5:32 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर गॅस दरवाढीचा निषेध करत मूक आंदोलन करण्यात आले. पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढले आहे. या दरवाढीमुळे सोलापुरात सध्या गॅस सिलेंडरची एका गॅस टाकीची किंमत 867.50 रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना आणि गृहिणींना बसला आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तोंडाला काळ्या फिती लावून केंद्र सरकार किंवा मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन

जानेवारीपासून 140 रुपयांची दरवाढ
कोरोना महामारीमुळे देशात उद्योगधंदे बंद आहेत.अनेक कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नाही. हाताला काम नसल्याने दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला धडपड करावी लागत आहे. असे असताना देखील मोदी सरकार किंवा केंद्र सरकारने 1 जानेवारी 2021 पासून आजतागायत 140.50 रुपयांनी दरवाढ केली आहे.या साथीच्या रोगाच्या काळात जनतेला मदतीचा हात देण्याची गरज असताना केंद्र सरकार महागाई वाढवून जनतेच्या नरड्यावर पाय देण्याचे काम करत आहे. गॅसच्या वाढत्या किंमती मुळे गृहिणींचे घरचे बजेट कोलमडले आहे.

गॅस दरवाढी विरोधात महिला एकवटल्या

महागाई कमी करण्याची मागणी
पेट्रोलियम पदार्थांचे दर गगनाला भिडत असल्याने इतर जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने पालेभाज्या,कडधान्ये इतर खाद्यपदार्थ महाग होत आहेत.वारंवार गॅस सिलेंडरचे दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेची आर्थिक कुचंबणा होत आहे.याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर मूक आंदोलन करण्यात आले.गॅसची किंमत कमी झाली नाही तर भविष्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा -अदानी ग्रुपला झटका, 4500 कोटींच्या आयपीओला सेबीकडून तात्पुरती स्थगिती

ABOUT THE AUTHOR

...view details