महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूरात खाणीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू

शेळगी परिसरातील थोबडे वस्तीजवळील लिंबोळे यांच्या दगडखाणीतील पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी घडली.

By

Published : Dec 14, 2020, 2:27 AM IST

खाणीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू
खाणीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू

सोलापूर - शेळगी परिसरातील थोबडे वस्तीजवळील लिंबोळे यांच्या दगडखाणीतील पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. शिवराज संतोष डबरे (वय 12) व त्याची मोठी बहीण कल्पना संतोष डबरे (वय 14, दोघे रा. शेळगी) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत.

एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नांतबहीण भावाचा मृत्यू-

कल्पना डबरे ही घरातील कपडे धुण्यासाठी दगडखाणीमध्ये आली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा चिमुकला भाऊ संतोष डबरे हा देखील होता. संतोष हा पाण्यामध्ये पोहण्यास उतरला असता तो पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. त्यावेळी कल्पना हिने वाचविण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पाण्यात बुडाले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नांत दोघांना आपले प्राण गमवावे लागले.

बाजूच्या शेतातील सालगड्याने मृतदेह तरंगताना पाहिले-

त्या दगडखाणीजवळ दोघांना वाचविण्यासाठी कोणीही नव्हते. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना बाजूच्या शेतात काम करणार्‍या सालगड्याने पाहिले आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर त्या परिसरात एकच गर्दी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम व सहकार्‍यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठिविला.

प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि गौण खनिज विभागाचे दुर्लक्षच-

गेल्या अनेक दिवसांपासून शेळगी, दहिटने, हिप्परगा आणि हगलूर परिसरातील शेतकरी आणि नागरिक प्रदूषण नियंत्रण महामंडळ, तहसीलदार, तलाठी, गौण खनिज विभागाकडे या अवैध खडी क्रशर मशीन आणि अवैध खाणीबद्दल तक्रार करत आहेत. पण प्रशासन विभाग या परिसरातील समस्याकडे दुर्लक्षच करत आहे.


हेही वाचा-लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; ट्रक-ऑटोच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details