सोलापूर- बंगळुरू येथून नवी दिल्लीला निघालेला कारगिल श्रद्धा कलश हा आज सकाळी सोलापूर रेल्वे स्थानकावर आला होता. यावेळी सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांनी कारगिल श्रद्धा कलशास अभिवादन केले.
कारगिल श्रद्धा कलश सोलापुरात; रेल्वे स्थानकावर महापौरांनी केले अभिवादन
दरवर्षी २६ जुलैला पूर्ण देशात कारगिल विजय दिन साजरा केला जातो. त्यासाठी निवृत्त कॅप्टन एस सी भंडारी यांच्या नेतृत्वात बंगळुरू येथून नवी दिल्ली येथे कारगिल श्रद्धा कलश घेऊन जात असतात. या प्रवासा दरम्यान श्रद्धा कलशचे आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले.
दरवर्षी 26 जुलैला पूर्ण भारतात कारगिल विजय दिन साजरा केला जातो. त्यासाठी निवृत्त कॅप्टन एस सी भंडारी यांच्या नेतृत्वात बंगळुरू येथून नवी दिल्ली येथे कारगिल श्रद्धा कलश घेऊन जात असतात. या प्रवासा दरम्यान श्रद्धा कलशचे आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पथकामधील सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्रद्धा कलश हा रेल्वे स्थानकावर काही वेळ ठेवण्यात आला.
यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने सलामी देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, मेजर शंकरराव खांडेकर, कॅप्टन उमाकांत कुलकर्णी, अरुण पवार, राजेंद्र बहिरट, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयतील अनिल कुमार मेगंशेट्टी, कॅप्टन मार्तंड दाभाडे, सुभेदार मेजर संजीव काशीद, समीर रकाटे, राजसाहेब शेख, चंद्रकांत साळुंके, दीनेश नागणे, गुरुनाथ कुलकर्णी, श्रीमती आशादेवी तसेच पोलीस कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी आणि सैनिकी वस्तीगृहातील मुलं-मुली यावेळी उपस्थित होते.