महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Bus Accident Solapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे केली जखमींची विचारपूस

अक्कलकोट मैनदर्गी मार्गावर एसटी बस वळण घेताना पलटी होवून ( ST Bus Accident Solapur ) अपघात झाला होता. या अपघाताची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी घेतली आहे. रुग्णालयातील जखमी रुग्णांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉल करून थेट संवाद साधला आणि रुग्णांची विचारपूस केली.

जखमीची बोलतांना मुख्यमंत्री
जखमीची बोलतांना मुख्यमंत्री

By

Published : Jul 24, 2022, 7:10 PM IST

Updated : Jul 24, 2022, 7:37 PM IST

सोलापूर -अक्कलकोट मैनदर्गी मार्गावर रविवारी सकाळी एसटी पलटी ( ST Bus Accident Solapur ) होऊन अपघात झाला होता. यामध्ये जवळपास 35 प्रवाशी जखमी झाले होते. या सर्व प्रवाशांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी घेतली आहे. रुग्णालयातील जखमी रुग्णांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉल करून थेट संवाद साधला आणि रुग्णांची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी आणि इचर पदाधिकारीही उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना जखमी रुग्ण आणि नेते

जखमी प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार :अक्कलकोट येथे एसटी पलटी होऊन मोठा अपघात झाला होता. सर्व प्रवाशांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची तत्काळ दखल घेत शिवसेना नेते महेश कोठे यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉल केला आणि रुग्णांची तब्येतीबाबत विचारपूस केली. जखमी प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार :रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास एसटी पलटीहोऊन अपघात झाला होता. यामध्ये जवळपास 35 प्रवाशी जबर जखमी झाले होते. रुग्णवाहिकेमधून सर्व रुग्णांना ताबडतोब अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागले. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर देखील अनेक दिवसंपासून बंदच आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आणि उपस्थित असलेल्या एका डॉक्टरकडून प्रथमोपचार करून घेतले. सर्व रुग्णांना सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे रवाना केले.


रविवार असल्याने डॉक्टरांच्या सुट्ट्या :सरकारी ग्रामीण रुग्णालय असो किंवा खाजगी रविवारी सर्व डॉक्टर सुट्टीवर असतात. पण ते मुख्यालयात असतात. अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेताच एकच धावपळ सुरू झाली. डॉ अशोक राठोड हे अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात तत्काळ हजर झाले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले हे अक्कलकोट किंवा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आलेच नाहीत.

हेही वाचा -ST Bus Accident Solapur : सोलापूरमध्ये वळण घेताना एसटी बस पलटली; 30 जण जखमी

Last Updated : Jul 24, 2022, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details