पुणे -एका ब्रेन डेड तरुणीच्या अवयवदानामुळे ५ रुग्णाना फायदा झाला आहे.रुग्णालयात अंतिम घटका मोजत असलेल्या एका तरुणीने दोन सैनिकांसह पाच रूग्णांना अवयवदानाद्वारे नवीन जीवन दिले. संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात शुक्रवारी ही माहिती देण्यात आली.
अवयवदानामुळे जीवनदान - संबंधित तरुणीच्या आयुष्याच्या शेवटच्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमांड हॉस्पिटल (सदर्न कमांड) येथे तिला दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांच्या निर्णयाने इतरांना जीवनदान मिळाले, असे पत्रकात म्हटले आहे.
कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदान - मृत्यूनंतर अवयवदान या संकल्पनेची जाणीव असल्याने ही किमया घडली आहे. रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकाशी चर्चा केल्यानंतर, ज्या रुग्णांना त्यांची नितांत गरज आहे अशा रुग्णांना महिलेचे अवयव दान करावेत, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. 14 जुलै आणि 15 जुलैच्या पहाटे, "किडनीसारख्या अवयवांचे भारतीय सैन्याच्या दोन सेवारत सैनिकांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.
डोळे आणि यकृताचाही वापर - या तरुणीचे डोळे सीएच (एससी) - सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय संकुलाच्या नेत्रपेढीमध्ये संरक्षित केले गेले. तसेच तिचे यकृत योग्य गरजू व्यक्तीला देण्यात आले. रुबी रुग्णालयाच्या पत्रकात याची माहिती देण्यात आली आहे.