महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुठा नदीत वाहून जात असलेल्या म्हशीला तरुणाच्या सतर्कतेमुळे जीवदान

मुठा नदीत म्हैस वाहून जात असताना, तरुणाच्या सर्कतेमुळे तीला पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले. म्हशींना चरण्यासाठी नदीकिनारी सोडण्यात आले होते. त्यातील एक म्हैस पाणी पिण्यासाठी नदीत गेली, मात्र पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ही म्हैस पाण्यात बुडू लागली. हे त्या ठिकाणी असलेल्या तरुणाच्या लक्षात आल्याने त्याने नदीत उडी घेऊन या म्हशीचे प्राण वाचवले.

saved buffalo
तरुणाने म्हशीचे प्राण वाचवले

By

Published : Oct 18, 2020, 6:18 PM IST

पुणे -पुण्यात दोन दिवसांपूर्वी डेक्कन भागात भिडे पुलाजवळ सेल्फी काढताना दोन तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आजही एक अशीच घटना घडली आहे. आज मुठा नदीत म्हैस वाहून जात असताना, तरुणाच्या सर्कतेमुळे तिला पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले. म्हशींना चरण्यासाठी नदीकिनारी सोडण्यात आले होते. त्यातील एक म्हैस पाणी पिण्यासाठी नदीत गेली, मात्र पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ही म्हैस पाण्यात बुडू लागली. हे त्याठीकाणी असलेल्या तरुणाच्या लक्षात आल्याने त्याने नदीत उडी घेऊन या म्हशीचे प्राण वाचवले.

संतोष वांजळे असं या तरुणाचे नाव आहे. त्याला म्हैस बुडत असल्याचं समजताच त्याने पाण्यात उडी घेतली. दहा ते पंधरा मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर या म्हशीला पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले. यावेळी नागरिकांनी हा थरार पाहाण्यासाठी नदी काठावर गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details