पुणे - अग्निशमन विभागाने शुक्रवारी रात्री आग लागलेल्या तीन मजली इमारतीतून दहा पर्शियन मांजरींची सुटका केली आहे. काल (दि. 28 जानेवारी)रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका तीन मजली इमारती घराला आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात येत आहे. या आगीत अडकलेल्या 10 पर्शियन मांजरींची सुखरूप सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केली आहे. यात 4 मोठी व 6 लहान पिल्ल्यांचा समावेश आहे.
पुण्याच्या घोरपडी पेठ येथील उर्दु शाळेजवळ एका तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे. आग मोठ्या प्रमाणात लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण ज्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती तिथे दहा पर्शियन मांजरी अडकले होते. जशी ही माहिती अग्निशामक जवानांना मिळाली तेव्हा त्यांनी या आगीत जाऊन या मांजरींना सुखरूप बाहेर काढले आहे. यात 4 मोठी व 6 लहान पिल्ले होती. धूर जास्त असल्याने या मांजरीच्या तोंडातून फेस येत होता पण जवानांनी यांना सुखरूप बाहेर काढले अशी माहिती अग्निशामक दलाचे जवान प्रदीप खेडेकर यांनी दिली आहे.