महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तडीपार गुंडाचा पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने हल्ला

पुण्यातील मंगळवार पेठेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तडीपार गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षकाने वार चुकल्यामुळे ते या घटनेतून थोडक्यात बचावले.

tadipar-hooligan-attack-police
tadipar-hooligan-attack-police

By

Published : Apr 19, 2021, 5:24 PM IST

पुणे - पुण्यातील मंगळवार पेठेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तडीपार गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षकाने वार चुकल्यामुळे ते या घटनेतून थोडक्यात बचावले. त्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या पथकावर विटा देखील भिरकावल्या. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी कुमार भागवत चव्हाण (वय 21) याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार तडीपार आरोपी पृथ्वीराज कांबळे याचा शोध सुरू आहे.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी आणि चौकाचौकात पोलिसांच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंगळवार पेठेतही शासकीय कॅमेरे लावण्यात आले होते. हे सीसीटीव्ही कॅमेरे हलवले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांना मिळाली होती. त्यामुळे रविवारी सायंकाळी काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते आरोपींना पकडण्यासाठी गेले होते.

दरम्यान या दोघांना पकडण्यासाठी जात असताना आरोपी प्रतीक कांबळे याने 'मला पकडतो का, तुला आता जिवंतच सोडत नाही' असे म्हणून फिर्यादी यांच्यावर हातातील कोयत्याने वार केला. परंतु वाडेवाले यांनी तो वार चुकल्यामुळे ते यातून थोडक्यात बचावले. तर दुसरा आरोपी कुमार चव्हाण याने पोलिसांच्या दिशेने विटा फेकून मारल्या.

फिर्यादी यांच्या सोबत असणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी कुमार चव्हाण याला पकडले. परंतु प्रतिक कांबळे हा पळून गेला. फरासखाना पोलिसांनी या दोघांवरही खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details