महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Building Collapse Pune : पुण्यातील येरवड्यात इमारत कोसळली; 5 जणांचा मृत्यू

पुण्यातील येरवडा भागात एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना ते अचानक कोसळले. यात 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. ताकीब आलम, सद्दाम आलम, शहीद आणि सोहेल असे मृत्यू झालेल्या चार व्यक्तीचे नाव आहे. तर एका व्यक्तीचे अजूनही कळू शकले नाही.

By

Published : Feb 4, 2022, 12:24 AM IST

Updated : Feb 4, 2022, 2:57 AM IST

येरवड्यात इमारत कोसळली
येरवड्यात इमारत कोसळली

पुणे -पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर गल्ली क्रमांक 8 येथे एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना ते अचानक कोसळले. यात 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. ताकीब आलम, सद्दाम आलम, शहीद आणि सोहेल असे मृत्यू झालेल्या चार व्यक्तीचे नाव आहे. तर एका व्यक्तीचे अजूनही कळू शकले नाही. या लोखंडी स्लॉटच्या खाली 10 कामगार काम करत होते त्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेतील 5 जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. या 5 जणांमध्ये 2 जणांचा प्रकृती चिंताजनक असून 3 जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळावरुन आढावा घेतांना प्रतिनिधी
  • अशी घटली दुर्घटना

शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक 8 येथे मॉलचे काम सुरू होते. या इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडे सांगाडा बांधण्याचे काम सुरू होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा सांगाडा अचानक कोसळला. त्याखाली तिथे काम करत असलेल्या जवळपास 10 कामगार खाली दाबले गेले. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती रात्री मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या रुग्णवाहिका तसेच दहा रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता, की त्या खालील दाबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रिक कारचा वापर करून हा सांगाड कापला. त्यानंतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले.

  • अनेक प्रश्न होत आहे उपस्थित

या मॉलचे काम सुरु असताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याचे बोलल्या जात आहे. शिवाय रात्री दहानंतर काम सुरू असलेला देखील पाहायला मिळाले. जर चुकीच्या पद्धतीने तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली गेली नसले, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे देखील यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले आहे.

  • यापूर्वीही पुण्यात अशीच दुर्घटना

2016 मध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. पुण्यातील बालेवाडी येथे बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळला होता. त्यात 9 मजुरांचा मृत्यू झाला होता. शिवाय यात अनेकजण जखमी झाले होते. जुलै 2016 मध्ये बालेवाडी परिसरात पार्क एक्सप्रेस या 14 मजली इमारतीचे काम सुरु होते. स्लॅब ठोकण्याचे काम सुरु असताना सकाळच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला होता. हा अपघात अत्यंत भीषण होता. यात काही मजूर 14 व्या मजल्यावरुन थेट खाली फेकले गेले होते.

हेही वाचा -श्यामसुंदर अग्रवाल खंडणीप्रकरणी सीआयडीकडून 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल

Last Updated : Feb 4, 2022, 2:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details