महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Student Protest In Pune : समाजकल्याण वसतिगृहे सुरु ठेवा.. विद्यार्थ्यांचे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातले ( Covid Spread In Maharashtra ) असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही बिकट होऊ लागला आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात ( Social Welfare Department Hostels ) राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने वसतिगृह खाली करून घेण्यास सांगण्यात येत ( Students Foreced To Leave Hostel ) आहे. त्याचाच विरोध करत विद्यार्थ्यांनी समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने ( Student Protest In Pune ) केली.

By

Published : Jan 11, 2022, 3:56 AM IST

विद्यार्थ्यांचे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
विद्यार्थ्यांचे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे राज्यभरातून असंख्य विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे वसतिगृह ( Social Welfare Department Hostels ) आणि स्वाधार योजना राबवली जाते. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत (Covid Spread In Maharashtra ) आहे. यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु ग्रामीण भागातून शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले जात ( Students Foreced To Leave Hostel ) आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दाद मागण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांकडे आपले निवेदन सादर ( Student Protest In Pune ) केले.

समाजकल्याण वसतिगृहे सुरु ठेवा.. विद्यार्थ्यांचे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या

निवेदनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाहीत. तसेच निर्वाह भत्ता देखील वेळेत मिळत नाही. स्वाधार योजनेचा कोणताही लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृह खाली करायला लावत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी यावेळी समाजकल्याण विभाग आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details