पुणे- सैन्याच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 01 एप्रिल 2022 रोजी आपला 128 वा स्थापना दिवस साजरा केला. दक्षिण कमांड या सर्वात जुन्या सेनेने आपल्या जबाबदारीखालील क्षेत्राचे सार्वभौमत्व यशस्वीपणे राखले आहे. राष्ट्र उभारणीसाठी अविरत योगदान दिले आहे.
दक्षिण कंमाडने 1 एप्रिल 1895 रोजी स्थापन ( Southern Command foundation ) झाल्यापासून, आपल्या सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाद्वारे आपल्या राष्ट्राची प्रादेशिक अखंडता ( territorial integrity of nation ) सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे. आपल्या देशाचे रक्षणासाठी दक्षिण कमांडने अनेक सैन्यदलाच्या ( Southern Command military operations ) कारवायांत भाग घेतला आहे. सन 1947-48 मध्ये, जुनागढ आणि हैदराबाद या पूर्वीच्या संस्थानांना भारताच्या संघराज्यात जोडण्यात दक्षिण कमांडने महत्त्वाची भूमिका बजावली.
जवानांना 70 शौर्य आणि विशिष्ट सेवा-पोर्तुगीज राजवटीपासून गोवा, दमण आणि दीवची मुक्तता 1961 मध्ये या कमांडच्या नेतृत्वखाली झाली. 1965 च्या युद्धादरम्यान, कमांडने कच्छच्या रणमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान लढलेल्या लौंगेवालाच्या लढाईत दक्षिण कमांडच्या शूर सैन्याने पाकिस्तानच्या आक्रमणाविरूद्ध भारतीय भूभागाचे रक्षण केले. प्रत्युत्तराच्या कारवाईत, कमांडच्या फॉर्मेशन आणि युनिट्सने खोखरापार आणि गद्रा मधील महत्वाच्या शत्रू क्षेत्रांवर विजय मिळविला. या कारवाईतील अतुलनीय यशासाठी, दक्षिण कमांडच्या जवानांना 70 शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आपत्ती निवारण मोहिमेद्वारेदेखील मोठे योगदान- श्रीलंकेत 'ऑपरेशन पवन'चे नेतृत्व करण्यासोबतच, कमांडने 'ऑपरेशन विजय' तसेच 'ऑपरेशन पराक्रम' मध्येही आपले शौर्य दाखवले. विविध सैन्यदलाच्या कारवायांमध्ये आपले कौशल्य सतत सिद्ध केले. दक्षिण कमांडने अकरा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारलेल्या जबाबदारीच्या विशाल क्षेत्रात, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमेद्वारेदेखील मोठे योगदान दिले आहे.
संयुक्त सैन्यदलाचे प्रशिक्षण सराव - दक्षिण कमांड, गेल्या काही वर्षांत, एक शक्तिशाली लढाऊ दल म्हणून उदयास आली आहे. प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करून, कमांडने अलीकडेच वाळवंटातील 30,000 हून अधिक सैनिकांचा समावेश असलेल्या दक्षिण शक्तीचा सराव केला. गेल्या वर्षभरात, दक्षिण कमांडने विदेशी मित्र देशांसोबत अनेक संयुक्त सैन्यदलाचे प्रशिक्षण सरावही आयोजित केले होते. सतत आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करून, कमांडने स्वदेशी उद्योगातून मिळवलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत.