पुणे -पुण्यात कॅनलमध्ये पडून सख्ख्या बहीण - भावाचा ( Sister brother died falling in canal pune ) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील उरळी कांचन येथील सोरतापवाडीत असलेल्या जुना बेबी कालव्यात ( Sister brother died Sortapwadi pune ) पडून त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, जागृती दत्ता ढवळे (वय ६) आणि शिवराज दत्ता ढवळे (वय ३) असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे.
हेही वाचा -Angarki chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थी निमित्त 'दगडूशेठ' गणपतीला स्वराभिषेक, मंदिराला सुंदर फुलांची आरास
नेमके काय घडले? -मिळालेल्या माहितीनुसार, जागृती आणि शिवराज हे दोघे बहीण बाहू काल रात्रीच्या सुमारास सायकल खेळत होते. जागृती सायकल चालवत होती, तर तिचा लहान भाऊ शिवराज हा सायकलच्या मागच्या सीटवर बसला होता. हे दोघेही कालव्याच्या पलीकडे असलेल्या आपल्या अत्याच्या घरी जात होते. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.
दोघेही कॅनलवरील रस्त्याने जात असताना सायकल घासरली आणि दोघे बहीण भाऊ सायकलसह कॅनलमध्ये पडले. दोन्ही मुले बराच वेळ झाली तरी घरी आली नसल्याने त्यांची आई या दोघांना शोधण्यासाठी त्यांच्या आत्याच्या घरी गेली. परंतु, हे दोघे त्यांच्या आत्याच्या घरी नसल्याचे त्यांच्या आईला समजले आणि त्यांनी आसपासच्या परिसरात त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली. शोध घेत असतानाच त्यांची सायकल व चप्पल जुना बेबी कॅनलजवळ पडलेली आढळून आली.
सोरतापवाडी येथील तरुणांनी कॅनलमध्ये दोन्ही मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कालव्यात २ ते ३ किलोमीटर शोध घेतल्यानंतर हे दोघे बालके जलपर्णीत अडकल्याचे आढळून आले. लगेचच त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली.
हेही वाचा -सियाचीनमध्ये भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळांमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा होणार विराजमान