पुणे-औषधी उद्योगात भारताने नवा महत्त्वाचा टप्पा गाठला ( new milestone in the pharmaceutical industry ) आहे. विशेष म्हणजे त्यासाठी पुण्यातील कंपनीचे मोठे योगदान असणार आहे. भारतातील पहिली गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लशीचे ( HPV vaccine production ) सीरमकडून उत्पादन घेण्यात येणार आहे. या एचपीव्हीला डीजीसीआयची मान्यता मिळाल्याची माहिती सीरमचे संचालक अदर पुनावाला ( Adar Poonawala on cancer vaccine) यांनी ट्विट करून दिली आहे.
भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ( cervical cancer deaths in India ) मृत्यू होतो. महिलांवरील या घातक आजारावर मात करणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाची लस भारतातच बनवली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ही लस तयार केली ( Adar Poonawala on cancer vaccine ) जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो.
अदार पुनावाला यांनी सरकारचे मानले आभार-गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रथमच संपूर्ण भारतीय बनावटीची एचपीव्ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वसामान्य महिलांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात येईल. या वर्षांच्या अखेरीस ही लस उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने आमच्या लशीला दिलेल्या परवानगीसाठी आम्ही त्यांचे तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आभार मानतो, असे अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.