महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून समाजात विज्ञाननिष्ठा वाढावी, हेच मांडणार - डॉ. जयंत नारळीकर

विज्ञाननिष्ठा किती महत्त्वाची आहे, हे मांडण्याची संधी मला यानिमित्ताने मिळत आहे, याचा आनंद आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं मला आव्हानात्मक वाटतं. संमेलन हा भाषेचा उत्सव असतो. अशा व्यासपीठावर ‘मात्र जबाबदारीची जाणीवही मला आहे. अशी प्रतिक्रिया नाशिक येथे मार्च महिन्यात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी दिली.

Dr. Jayant Narlikar
Dr. Jayant Narlikar

By

Published : Jan 25, 2021, 1:23 AM IST

Updated : Jan 25, 2021, 4:03 AM IST

पुणे - आपल्या समाजाच्या धारणा एकविसाव्या शतकातही बदललेल्या नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताशी असूनही, त्याचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी आजही केला जात आहे. यामुळे निराशा वाटते. पण मी आशावादी आहे. त्यामुळे युवा पिढीवर विश्वास ठेवून आपण वाटचाल करायला हवी. त्यासाठी समाजात विज्ञाननिष्ठा वाढावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही मी हेच मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले.

डॉ. जयंत नारळीकर
नाशिक येथे मार्च महिन्यात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता, सन्मानाने हे पद दिले जावे. या नव्या परंपरेतले डॉ. नारळीकर हे तिसरे मानकरी ठरले. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी डॉ. नारळीकर यांनी झूम मिटिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना नारळीकर म्हणाले, विज्ञाननिष्ठा किती महत्त्वाची आहे, हे मांडण्याची संधी मला यानिमित्ताने मिळत आहे, याचा आनंद आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं मला आव्हानात्मक वाटतं. संमेलन हा भाषेचा उत्सव असतो. अशा व्यासपीठावर ‘मात्र जबाबदारीची जाणीवही मला आहे. नवीन शोधांची माहिती जनसामान्यांना देणं, त्या शोधांच्या गुणावगुणांची स्पष्टता समजून घेणं आणि लोकांना समजेल अशा भाषेत, समजावून देणं, हे विज्ञानविषयक लेखन करणाऱ्यांचे कर्तव्य आहे.मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी ते म्हणाले, कुठल्याही संकल्पना प्राथमिक आकलनासाठी मातृभाषेतूनच समजून घेतल्या पाहिजेत, असे माझे मत आहे. जे पालक मुलांना सुरवातीपासून इंग्रजी भाषेत शिकवण्याचा आग्रह धरतात, ते भविष्यातील मातृभाषेच्या भावी वाचकांवरच घाला घालत असतात. इंग्रजी भाषा जरूर यावी, पण प्रारंभिक आकलन मातृभाषेतच असावे. अभिजात दर्जासाठी आधी भाषा भरभरून बोलली, लिहिली, छापली गेली पाहिजे.
Last Updated : Jan 25, 2021, 4:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details