पुणे - सध्या संपूर्ण जग हे सोशल झालेले आहे. जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यांत कोणताही संदेश चुटकीसरशी पोचवला जात आहे. यातच कोरोना सारख्या महामारीने लोकांना ऑनलाईन खरेदी ऑनलाईन बँकिंग (Online shopping online banking) यासारखे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र हे सर्व पर्याय इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत. इंटरनेट वापरताना प्रत्येकाने सतर्कता आणि जबाबदारीने याचा वापर करणे किती गरजेचे आहे यावर आज आपण प्रकाश टाकला आहे.
सध्या बाजारात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. त्यासाठी एक नवीन फंडा नजरेस येत आहे. इंटरनेटवर बेरोजगारांना किंवा नवीन स्टार्टअप करणाऱ्यांना चुटकीसरशी लोन दिले जाते. मात्र या लोन वर चक्रवाढव्याज लावला जाते आणि नंतर ज्या कंपनीकडून हे लोन दिलं गेलेलं आहे, ती कंपनी हप्ता भरण्यासाठी ग्राहकाच्या मागे तगादा लावते. मात्र ग्राहक हे लोन फेडण्यासाठी सक्षम नसला, तर सोशल मीडियावरून त्यांचे नातेवाईक कुटुंब मित्र मंडळ या सर्वांना फोन करून, या इसमाची बदनामी केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही स्कीमला लोकांनी बळी पडू नये, असे पोलीस नागरिकांना आवाहन करतात.
त्यानंतर दुसरा एक ट्रेण्ड असा आलेला आहे, ज्यामध्ये इंटरनेट वरून किंवा फेसबुक वरून मुलगी मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर मात्र त्याला व्हॉटसअपवर सेक्सुयल हॅरेस्मेंट (Sexual Harassment on WhatsApp) करते. त्याचे व्हिडिओ लीक करण्याची धमकी (Threatened to leak video) देऊन वारंवार त्याच्याकडे पैशाची मागणी करते, अशा वेळी आपल्या बदनामीला घाबरून हे युवक किंवा युवती ते सायबरकडे तक्रार करत नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांना वाव मिळतो आणि अशा गुन्हेगारांचे मनोबल वाढत जातं. परंतु अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी वेळीच सायबर क्राईम पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद केली, तर असे गुन्हे थांबू शकतात असेही पोलीस सांगतात. इंटरनेट वापराबाबत कोणकोणती जबाबदारी राखणे गरजेचे आहे. याबाबत आपल्याशी बातचीत केली आहे, सायबर मुख्यालय पुणे शहराचे सायबर क्राईम पोलीस उपनिरीक्षक सागर पडवळ यांनी माहिती दिली आहे.
संकेतस्थळांचा अभ्यास करणे गरजेचं -