महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवारांचा कारभार अत्यंत सुक्ष्म आणि नियमाला धरून, ईडीने त्यांची चौकशी करू नये - रामदास आठवले

शरद पवार नियमाला धरून काम करणारे नेते आहेत. असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

By

Published : Sep 27, 2019, 7:35 PM IST

पुणे - शरद पवारांचा कारभार अत्यंत सुक्ष्म आहे. ते नियमाला धरून काम करणारे नेते आहेत. त्यांची चौकशी ईडीने करू नये, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी व्यक्त केली. पुण्यातील अरण्येश्वर परिसरात पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

हेही वाचा - तृप्ती देसाईंच्या वडीलांना सहा महिन्यांच्या शिक्षेसह 60 लाखांचा दंड; 'चेक बाऊन्स' प्रकरण भोवले

शरद पवारांचा कारभार अत्यंत सुक्ष्म आहे. नियमाला धरून काम करणारे ते नेते आहेत. त्यांची चौकशी ईडी करणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. शरद पवारांनीही त्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी घेतलेली ही भूमिका नक्कीच चांगली होती. पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे आरोप होणे योग्य नाही. अण्णा हजारे यांनीही संबंधित घोटाळ्यात शरद पवारांचे नाव नसल्याचे सांगून ईडीने त्यांची चौकशी करू नये असे सांगितले होते. आमचेही तेच मत असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची पाठराखण केली.

हेही वाचा - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने, ईडीच्या कारवाईचा निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details