पुणे: पुणे डाक विभागातर्फे (Pune Postal Department) जागतिक पोस्ट दिनानिमित (world post day) आयोजित टपाल सेवा सप्ताहात (postal service week) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागाने आयपीबीबी मार्फत जनरल इन्शुरन्स योजना देशात प्रभावीपणे राबवून पहिला क्रमांक मिळवला आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल १.६६ कोटी रुपयांचं प्रीमियम गोळा करण्यात आलं आहे. या सोबतच माझी कन्या सुकन्या, पीपीएफ खाते या सारख्या योजनाही प्रभावीपणे राबविल्या असल्याची माहिती पुणे डाक क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली आहे.
९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान टपाल सप्ताह आयोजित: पुणे पोस्ट विभागातर्फे ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान टपाल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना जायभाये म्हणाले की, पुणे टपाल क्षेत्राने आतापर्यंत पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएसआय) आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (आरपीएलआय) योजनेअंतर्गत 8.9 लाखांहून अधिक लोकांचा जीवन विमा उतरवला आहे. यावर्षी पुणे क्षेत्राने ९९ टक्के दाव्यांचा निपटारा केला आहे. आय.पी.पी.बी च्या पुणे क्षेत्रात ६ शाखा असून त्यात आत्तापर्यंत ११ लाखाहून अधिक बचत खाती उघडल्या गेली आहेत. आय.पी.पी.बी ने या आर्थिक वर्षात १,१५,०४२ लोकांचा विमा जनरल इन्शुरेंस अंतर्गत केला आहे. पुणे टपाल क्षेत्र हे भारतात आय.पी. पी.बी मार्फत जनरल इन्शुरेंस योजना राबविण्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे देखील जायभाय यांनी सांगितले.
ग्रामीण भागात पोस्टाची वाढ: पुणे टपाल क्षेत्रामध्ये पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांत सेवा दिल्या जात आहेत. या विभागात तब्बल २ हजार ६५७ पोस्ट कार्यालये असून त्यातील जवळपास ८९ टक्के कार्यालये ही ग्रामीण भागात आहेत. पुणे विभागाने आधुनिकीकरणाची कास धरली असून ऑनलाइन व्यवहारासोबतच वेगवान पार्सल सुविधा देखील सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस बचत योजना अजूनही लोकप्रिय आहे. या वर्षी पुणे टपाल क्षेत्राlतील ९ लाखाहून अधिक खात्यांमध्ये १३ हजार कोटींचे व्यवहार करण्यात आले आहे. यासोबतच पुणे टपाल क्षेत्रात एकूण ५५.१० लाख पोस्ट ऑफिस बचतखाली चालू आहेत. यावर्षी एकूण ३.७१ लाख खाती उघडण्यात आली आहे. यात वर्षभरात २० टक्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात पुणे क्षेत्राने २.०९ लाखांहून अधिक नवीन खाती उघडली होती, अशी माहिती यावेळी जायभाये यांनी दिली. पुणे रीजन मध्ये मागील आर्थिक वर्षात पोस्ट ऑफिसमधील २४८ आधार केंद्रांत ४९ हजार पेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त, याच कालावधीत २ लाखांहून अधिक नागरिकांना पोस्ट ऑफिसद्वारे आधार अद्ययावत सेवा प्रदान करण्यात आली आहे, असं देखील यावेळी जायभाये म्हणाले.
पुणे टपाल विभागा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन: राष्ट्रीय टपाल सप्ताहा दरम्यान, पुणे टपाल विभागाने वित्तीय सशक्तीकरण दिवसा च्या निमिताने 10 ऑक्टोबर रोजी 3213 खाती उघडली. ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स द्वारा 1988 पॉलिसी इश्यू केल्या. त्याच प्रमाणे 92 खेडी संपूर्ण सुकन्या ग्राम घोषित केली आहेत, 9 खेडी "पंचतारांकित खेडी" म्हणून घोषित केली तर 15 खेडी संपूर्ण विमा ग्राम म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच 11 ऑक्टोबर रोजी फिलाटेली दिवसाच्या निमिताने जी आय संकेत प्रमाणित पुरंदर अंजीर, आंबेमोहोर तांदूळ तर खाद्य प्रसंस्ककरण उद्योग मंत्रालय द्वारा आत्मनिर्भर भारत अन्वये पीएमएफएमई योजनेला प्रोत्साहन मिळण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन विषयावरील पुणे जिल्ह्याच्या टोमॅटो उत्पाद आणि अहमदनगर जिल्हया साठी दुध उत्पादन या विषयावर विशेष कव्हर जारी केले, तसेच विविध शाळांमध्ये कार्यशाळा देखील आयोजित केल्या गेल्या.
12 ऑक्टोबर रोजी "टपाल आणि पार्सल दिवस निमित्ताने चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात पार्सल पॅकिंग यूनिट ची सुरुवात केली आहे. पुणे टपाल क्षेत्र भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेसाठी योगदान म्हणून, योजना सुरू झाल्यापासून 8 ऑक्टोबर पर्यंत 5 लाख पेक्षा जास्त मुलींची संपूर्ण सुकन्या खाती उघडली आहेत. ही योजना इतर कोणत्याही बचत योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या व्याजापेक्षा उच्चतम व्याज दर 7.6% देते. आणि मुलींना सुरक्षित भविष्य प्रदान करते, असं देखील यावेळी जायभाये यांनी सांगितलं.