पुणे - सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने जाहीर केलेल्या या दराचा भीम आर्मीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याविरोधात सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने देशभरासाठी एकसमान दर जाहीर नाही झाले, तर रस्त्यावर सीरम इन्स्टिट्यूटच्या गाड्या अडवू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
'देशभर एकच किंमत जाहीर करा, अन्यथा गाड्या अडवू'
सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने जाहीर केलेल्या या दराचा भीम आर्मीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याविरोधात सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट बाहेर भीम आर्मीतर्फे निषेध आंदोलन