PMPML Providing E facilities : नवीन पब्लिक चार्जिंग स्टेशन, ई कॅब सर्व्हिस; पीएमपीएमएलची वाटचाल आत्ता ई सेवांकडे
पीएमपीएमएल नवीन पब्लिक चार्जिंग स्टेशन (Public Service Station) , ई कॅब सर्व्हिस (E Cab Service) तसेच महामंडळाच्या ताफ्यात आणखी 500 ई बसेस लवकर दाखल होणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
PMPML
पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने येत्या काळात नवनवीन योजना सुरू करण्यात येणार असून पीएमपीएमएलची वाटचाल आत्ता ई कडे होणार आहे. पीएमपीएमएल नवीन पब्लिक चार्जिंग स्टेशन (Public Service Station) , ई कॅब सर्व्हिस (E Cab Service) तसेच महामंडळाच्या ताफ्यात आणखी 500 ई बसेस लवकर दाखल होणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने प्रवाश्यांच्याकरिता ओला उबेर प्रमाणे ई कॅब सेवा सुरू करण्यात येणार आहे.परिवहन महामंडळाच्यामार्फत ऑक्टोबर 20121 मध्ये ई कॅब प्रकल्पाबाबत लोकांकडून ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला त्यात 9180 लोकांनी भाग घेतला व त्यात 92 टक्के लोकांनी ई कॅब सर्व्हिस चालू करण्याबाबत हमी दर्शवली आहे आणि हे प्रकल्प लवकरच अमलात येणार आहे.असं यावेळी लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं.
पीपीपी मॉडेलवर पब्लिक चार्जिंग स्टेशन
पुणे शहरात इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे.दुचाकी,तीन चाकी, तसेच चारचाकी वाहने असतील या वाहनांकरिता 7 ठिकाणी पीपीपी मॉडेलवर पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार असून लोकांना लवकरात लवकर याचा फायदा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केलं जाणार आहे.
महामंडळाच्या ताफ्यात आणखी ईबसेससध्या महामंडळाकडे 150 ई बसेस असून टप्प्याटप्प्याने या ईबसेस घेण्यात येणार आहे.महामंडळाच्या ताफ्यात आणखी 500 ई बसेस लवकरच दाखल होणार आहे.या 500 ई बसेस पैकी 12 मी लांबीच्या 100 ईबसेस आलेल्या असून त्यापैकी 75 ई बसेसचे रजिस्ट्रेशन झालेले आहे.या सर्व 100 ई बसेस सध्या बाणेर ई बस डेपोमध्ये आहे.