पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शंभर पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले आहे. प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन रक्तदान करायला हवे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा, नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान
पिंपरी-चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या रुग्णालय प्रशासनाकडून सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनला प्रतिसाद संभाजी ब्रिगेडने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, यामध्ये शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने महानगर पालिका रुग्णालय प्रशासनाकडून रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केले जात आहेत. संभाजी ब्रिगेडने आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून थेरगाव परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिकांनी घराबाहेर पडत रक्तदान केले आहे. कोरोना संकटामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात आहे. संकटाच्या काळात आयोजित करण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरांना नागरिकांनी जास्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महानगर पालिका रुग्णालयाच्या डॉ. अपूर्वा लोंढे यांनी केले आहे. रक्तदान हे करणे खूप महत्त्वाचे असून शहरात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद द्यावा, असेही त्या म्हणाल्या.