महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना लसीकरणासाठी पुणे सज्ज; महापालिकेकडून 15 ठिकाणी तयारी पूर्ण

देशात 16 जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरणाचा पहिला टप्या सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात शहरातील खासगी आणि सरकारी आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jan 12, 2021, 12:11 AM IST

पुणे- सीरमच्या कोरोना लसीचे उत्पादन होणाऱ्या पुण्यातही कोरोना लसीकरणाची तयारी सुरू आहे.शहरात कोरोना लसीचे लसीकरणची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. शहरात 15 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

देशात 16 जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरणाचा पहिला टप्या सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात शहरातील खासगी आणि सरकारी आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. शहरातील 4 खासगी रुग्णालये आणि 11 महापालिकेच्या रुग्णालयामध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सुरुवातीला कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. पुणे महापालिकेने राज्य सरकारच्या सुचनांनुसार शहरातील खासगी आणि सरकारी कर्मचार्‍यांची माहिती मागवली होती. त्यानुसार 52 हजार 702 आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. यामध्ये 11 हजार 74 हे सरकारी सेवक आहेत. तर 41 हजार 628 हे खासगी आरोग्य सेवक आहेत.

पुणे शहरामध्ये पहिल्या आणि दुसर्‍या टप्यासाठी एकूण 1 लाख 15 हजार 825 इतक्या लसी लागणार आहेत. लसीकरणाची तयारी झालेली असताना सरकारकडून लस कधी दिली जाणार याची उत्सुक्ता आहे. अद्याप लसीसंदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन शासन राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे.

हेही वाचा-राज्यभर ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी - राजेश टोपे


या रुग्णालयात होणार लसीकरण

  • सुतार दवाखाना कोथरुड
  • कमला नेहरु दवाखाना
  • राजीव गांधी रुग्णालय
  • कलावती मावळे दवाखाना
  • शंकर महाराज दवाखाना
  • बाळासाहेब ठाकरे रुग्णालय
  • शिवरकर दवाखाना
  • एकनाथ निम्हण प्रसुुतिगृह
  • बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय
  • दळवी रुग्णालय
  • दिनानाथ मंगेशकर रुग्णालय
  • भारती हॉस्पीटल
  • नोबल हॉस्पीटल
  • रुबी हॉल
  • जोशी हॉस्पीटल

हेही वाचा-पुढील काही महिन्यांमध्ये ३० कोटी लोकांचे लसीकरण; पंतप्रधान मोदींची माहिती

दरम्यान, केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत सीरमकडून उत्पाद होणारी ऑक्सफोर्ड लस व भारत बायोटेकच्या लसीला वापरासाठी परवानगी दिली आहे. लसीकरणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी ड्राय रनही घेण्यात आलेला आहे.

देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला, तसेच राज्य सरकारांना विविध निर्देशही दिले. येत्या काही महिन्यांमध्ये देशातील 30 कोटी नागरिकांना लस देण्याचे ध्येय असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details