पुणे -शिंदे सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केले आहे. यावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपल मत व्यक्त केले आहे. मी अडीच वर्ष अर्थमंत्री असताना मागच्या अर्थसंकल्पात गॅसच्या किंमतीबाबत टॅक्स साडे तेरा टक्के कमी केले आहे. त्यावेळेस आज सत्तेत असलेले लोक त्यावेळी विरोधात जेव्हा होते तेव्हा म्हणायचे की राज्य सरकार जेवढं पेट्रोल आणि डिझेलला ( Petrol diesel rates ) टॅक्स लावत आहे. त्याच्या 50 टक्के टॅक्स हा कमी केल पाहिजे, अशी मागणी ते करत होते. आज ते सरकारमध्ये आहे तर त्यांनी का पेट्रोल आणि डिझेलच टॅक्स 50 टक्के कमी केले नाही. पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol diesel rates ) जे कमी केले आहेत ते अतिशय तुटपुंजी स्वरूपातील केल्या आहेत, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी केली आहे.
आज 3 आणि 5 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या पण सातत्याने केंद्र सरकार हे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करत आहे. आज सर्वच घटकातील लोक हे भेटून सांगतात की दादा तुम्ही टॅक्स कमी केला पण केंद्राने वाढवल्याने पुन्हा आहे तेच दर राहिले. सरकार बदलल्यानंतर काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत, असा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहे. पेट्रोल डिझेलचे दर जे कमी केले आहेत ते अतिशय तुटपुंजी स्वरूपातील केल्या आहेत. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना जास्त होईल, अस वाटत नाही, अशी टीका देखील यावेळी पवार यांनी केली.