महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमध्ये कांदा फक्त ८० पैसे किलो,  'हे' आहे कारण

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग ५० वर्ष सक्रिय असलेले शरद पवार यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये ८० पैसे दराने कांदा विक्री करण्यात आला.

on-the-occasion-of-sharad-pawars-birthday-the-ncp-sold-onion-at-80-paise-in-pune
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शंभरी पार केलेला कांदा ८० पैशात

By

Published : Dec 12, 2019, 6:10 PM IST

पुणे -राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग ५० वर्षे सक्रिय असलेले शरद पवार ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शंभरी पार केलेला कांदा ८० पैशात

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांनी चक्क ८० पैशाला एक किलो कांदा गृहिणींना वाटला. सध्या राज्यात कांद्याचा दराने शंभरी गाठली आहे. मात्र, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्तात कांदा देण्यात आला. ही अनोखी शक्कल नागरिकांना चांगलीच आवडलेली आहे. दरम्यान, कांदा विकत घेण्यासाठी महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

ABOUT THE AUTHOR

...view details