महाराष्ट्र

maharashtra

Narendra Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 एप्रिलरोजी

By

Published : Mar 30, 2022, 7:40 PM IST

Updated : Mar 30, 2022, 7:50 PM IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ( Narendra Dabholkar Murder Case ) आज शिवाजीनगर कोर्टात साक्षीदाराची उलट तपासणी करण्यात ( Dabholkar Murder Case Vitness ) आली आहे. यात साक्षीदाराने आरोपींना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांच्या माध्यमातून ओळखल असल्याचं सांगितलं आहे.

Narendra Dabholkar Murder Case
Narendra Dabholkar Murder Case

पुणे -अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ( Narendra Dabholkar Murder Case ) आज शिवाजीनगर कोर्टात साक्षीदाराची उलट तपासणी करण्यात ( Dabholkar Murder Case Vitness ) आली आहे. यात साक्षीदाराने आरोपींना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांच्या माध्यमातून ओळखल असल्याचं सांगितलं आहे. वर्तमानपत्राच्या बातम्यांच्या माध्यमातून ओखळण्याला कितपत महत्त्व द्यायचं, असा सवाल बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला आहे. आज न्यायालयात साक्षीदाराची उलट तपासणी करण्यात आली असून येत्या 12 एप्रिल तारखेला ( Narendra Dabhokar Case Next Hearing Date ) पुन्हा सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया

२०१३मध्ये झाली होती हत्या -अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती. ६७ वर्षीय डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलेलं होतं. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही स्थापन केली होती. दरम्यान, २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉक करत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आतापर्यंत ५ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणात बऱ्याचा आरोपी बदलवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने होत असल्याची प्रतिक्रिया बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकांजिकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -World Whistlers Champion : ओठाची हालचाल न करता कंठातून शिट्टी वाजवणारा अवलिया

Last Updated : Mar 30, 2022, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details