महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lockdown: पिंपरी-चिंचवडमध्ये 449 कोरोनाबाधितांची  नोंद; 15 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील आतापर्यंत 143 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जास्त रुग्ण आढळत असल्याने दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Corona update
पिंपरी चिंचवड महापालिका

By

Published : Jul 16, 2020, 7:42 AM IST

पिंपरी-चिंचवड- लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने 449 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच 15 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे 356 जण कोरोनामुक्तही झाले आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 8 हजार 603 वर पोहचली असून, आतापर्यंत 5 हजार 235 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील आतापर्यंत 143 कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जास्त रुग्ण आढळत असल्याने दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. बउधवरी 449 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे कोरोना विषाणू वर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, रुग्णांची संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण हे रहाटणी (पुरुष, ६९ वर्षे) भोसरी (पुरुष, ७० वर्षे) भोसरी (पुरुष, ७५ वर्षे) कासारवाडी (स्त्री, ६८ वर्षे) अजंठानगर निगडी (स्त्री,६० वर्षे) दापोडी (पुरुष,७२ वर्षे) पिंपरी (पुरुष,६२ वर्षे) थेरगांव (पुरुष,७२ वर्षे) अजंठानगर चिंचवड (पुरुष,५५ वर्षे) पिंपरीगांव (परुष,७७ वर्षे) भोसरी (पुरुष,७३ वर्षे) थेरगांव (पुरुष,३६ वर्षे) भोसरी (स्त्री,५५ वर्षे) दापोडी (पुरुष,७६ वर्षे) औंधरोड (स्त्री,७३ वर्षे) येथील रहिवासी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details