महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP MLA Fraud : 'बंटी बबली'ने केली भाजपच्या 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; दोघांना अटक

राज्यातील चार भाजप महिला आमदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आई बाणेर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या औषध उपचाराकरिता पैशाची गरज आहे, असे सांगून या चार महिला आमदारांची फसवणूक झाली ( Mpsc Student Fraud Bjp MLA ) आहे.

BJP MLA Fraud
BJP MLA Fraud

By

Published : Jul 21, 2022, 6:41 PM IST

पुणे -राज्यातील चार भाजप महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार माधुरी मिसाळ ( Mla Madhuri Misal), आमदार श्वेता महाले ( Shweta Mahale), आमदार मेघना बोर्डीकर ( Meghna Bordikar ), आमदार देवयानी फरांदे ( Devyani Farande ) या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरला तक्रार दिली होती, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये ( Bibwewadi Police ) एका अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Mpsc Student Fraud Bjp MLA ) होता.

आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करून मुकेश राठोड असे नाव सांगत त्याची आई बाणेर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या औषध उपचाराकरिता पैशाची गरज आहे, असे सांगून 3 हजार 400 रुपये गुगल पे नंबर देऊन पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर माधुरी मिसाळ या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी त्यांचे सहकारी आमदार देवयानी फरांदे, मेघनाताई साकोरे, मेघना बोर्डीकर, श्वेताताई महाले यांनाही आरोपी मुकेश राठोडने फोन करून अशाच प्रकारचे कारण सांगून पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिकारी माहिती देताना

आरोपी मुकेश राठोड हा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. त्याचे शिक्षण बी. ए. झाले आहे. तर, त्याने ज्या गुगल पे नंबरचा वापर केला, त्या सुनीता कल्याण क्षीरसागर असं त्या नंबर धारकाचे नाव आहे. सुनीता ही बीएस्सी झाली असून, ती औरंगाबादची राहणारी आहे. हे दोघेही या गुन्हातील आरोपी आहेत. हे दोघेही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. या दोघांनाही खर्चासाठी पैसे हवे होते. त्यामुळे या दोघांनी मिळून या चार आमदारांना खोटं सांगत पैसे घेतले.

वैद्यकीय कारणाचे कारण सांगितल्यावर पैसे मिळतात म्हणून त्यांनी हे कारण सांगितले होते. वैद्यकीय कारणासाठी आमदार मदत करतात ही माहिती दोघांना होती. या दोघांनाही औरंगाबादहून ताब्यात घेतले आहे. हे दोघे शेतकरी कुटुंबातील असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या दोघांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का?, याचा तपास बिबवेवाडी पोलीस ककरत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हेही वाचा -Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'

ABOUT THE AUTHOR

...view details