पुणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी 'मंदिर उघडा' आंदोलन हाती घेतले असून पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे मंदिर उघडून अभिषेक करत पुणेकरांना देवदर्शनासाठी मंदिर सुरू केले आहे.
हेही वाचा -कृषी न्यायालये स्थापन करा... किसान सभेची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, 'राज्यात सर्व गाेष्टी सुरू झाल्या असून सरकार केवळ मंदिर उघडण्यास परवानगी देत नाही. कोरोना काय फक्त मंदिरातच राहतो का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 'सरकारने काही बंधने घालून मंदिर उघडण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मंदिर उघडण्याचा मागणीसाठी मनसे आक्रमक 'वारंवार पाठपुरावा करूनही सरकार मंदिर उघडत नसल्यामुळे मनसेला आक्रमक भूमिका घेत मंदिर उघडावी लागत आहेत. शासनाने लवकर परवानगी न दिल्यास शहरातील सर्व मंदिरे जनताच उघडेल. मंदिर, देव हा लाेकांचे श्रध्देचा विषय असून सरकार ती खुली करत नसल्याने नागरिकांचे मनात असंताेष आहे. शासन बिअरबार पासून गुटख्यापर्यंत सर्व गाेष्टींना परवानगी देते आणि केवळ काेराेनाचे कारण सांगून मंदिर बंद ठेवते हे लाेकांना न पटणारे आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा,' असे मनसेतर्फे म्हटले आहे. हेही वाचा -पुण्यात साउंड इलेक्ट्रिकल्स असोसिएशनचा मूक मोर्चा, इव्हेंट्सवरील बंदीबाबत संताप