महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पदकांचे अनावरण, देखणी स्पर्धा आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शुक्रवारी ३ जानेवारीला सुरुवात होतनार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले.

By

Published : Jan 2, 2020, 11:09 PM IST

medal-of-maharashtra-kesari-competition-medal-was-inaugurated
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पदकांचे अनावरण

पुणे -६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शुक्रवारी 3 जानेवारीला सुरुवात होते आहे. या निमित्ताने गुरुवारी स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या पदकांचे अनावरण राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे ६३ या स्पर्धा आयोजीत केल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पदकांचे अनावरण

शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, संग्राम थोपटे, सुनील शेळके, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवडीचे उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, क्रीडा व युवक सेवा मुख्यालयाचे उपसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या पूर्व संध्येला परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी आखडे व तयारीची पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details