पुणे -गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने ( Maharashtra Corona Increased ) वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत इशारा दिला आहे. राज्यात जर ७०० मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी होत असेल. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अजित पवार ( Ajit Pawar On Maharashtra Lockdown ) यांनी म्हटले.
पुण्यात अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, "कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. रुग्ण वाढत आहे. बहुतेक जण घरीच थांबून उपचार घेत आहेत. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. मात्र, हे सगळे होत असताना उद्या जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. तसेच, ७०० मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही," असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
लवकरच बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जाहीर करू